कन्या महाविद्यालयाच्या बास्केटबॉल खेळाडूंना क्रीडा महोत्सव स्पर्धेत रौप्य पदक
दिनांक ०७ डिसेंबर, २४ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा - क्रीडा महोत्सव २०२२ स्पर्धेत कन्या महाविद्यालयाच्या बास्केटबॉल खेळाडू कु. वैष्णवी कदम, कु. श्रावणी खाडे, कु. प्रतिक्षा सांगले यांनी रौप्य पदक पटकाविले.
दि. ३ ते ७ डिसेंबर २०२२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मरावाडा विद्यापीठ, औरंगाबाद (संभाजीनगर) येथे २४ वी महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा - क्रीडा महोत्सव २०२२ पार पडली. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉलचे मुले व मुली चे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत साठी महाराष्ट्रातील २२ विद्यापीठांनी आपला सहभाग नोंदविला.
कन्या महाविद्यालयाच्या बास्केटबॉल खेळाडू कु. वैष्णवी कदम, कु. श्रावणी खाडे, कु. प्रतिक्षा सांगले यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघाचे प्रतिनिधित्व केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाने सर्व सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात शिवाजी विद्यापीठ संघाने रौप्य पदक पटकाविले.
दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. विनायकराव गोखले, संचालक चंद्रशेखर मराठे तसेच संस्थेचे सचिव मा. राजू झाडबुके यांनी यश प्राप्त खेळाडूंचे कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. उल्हास माळकर, उपप्राचार्य डॉ. सुनिता माळी, पर्यवेक्षिका सौ. नलिनी प्रज्ञासूर्य, आयक्यूएसी समन्वयक डॉ. माधुरी देशमुख, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. बाबासाहेब सरगर, प्रा.भरत पाटील, प्रा. भाग्यश्री कुंभारकर यांचे या खेळाडुंना मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment
Thanks you