कन्या महाविद्यालयाच्या राजनंदिनीचे तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत यश
दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज, सांगली येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत कन्या महाविद्यालयाची तायक्वांदो खेळाडू *कु. राजनंदिनी सूर्यवंशी बी. कॉम. भाग 3* हीने 46 किलो खालील वजन गटात तृतीय क्रमांक पटकावला व तिची आटपाडी येथे 13 व 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या इंटरझोनल स्पर्धेत निवड झाली.
दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. विनायकराव गोखले, संचालक चंद्रशेखर मराठे तसेच संस्थेचे सचिव मा. राजू झाडबुके यांनी यश मिळवलेल्या खेळाडूचे कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. उल्हास माळकर, उपप्राचार्य डॉ. सुनिता माळी, पर्यवेक्षिका सौ. नलिनी प्रज्ञासूर्य, आयक्यूएसी समन्वयक डॉ. माधुरी देशमुख, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. बाबासाहेब सरगर, प्रा.भरत पाटील, प्रा. भाग्यश्री कुंभारकर यांचे या खेळाडुंना मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment
Thanks you