कु. तनुजा रावसाहेब बनसोडे हीचे जलतरण स्पर्धेत यश
जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय जलतरण क्रीडा स्पर्धा दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडल्या. या सपर्धेत सांगली जिल्ह्यातून जवळपास 50 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत आपल्या कन्या महाविद्यालय, मिरज ची विद्यार्थिनी कु. तनुजा बनसोडे बी.ए.भाग 1 हिने सहभाग नोंदविला. तिने या स्पर्धेत 400 मी. बॅक स्ट्रोक प्रकारात द्वितीय क्रमांक व 100, 200, 800 मी. फ्री - स्टाईल प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. तिचे हार्दिक अभिनंदन.... या स्पर्धेच्या यशाबद्दल तिचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment
Thanks you