मिरज: कन्या महाविद्यालय आयोजीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली संघाने पुरूष गटात विजेतेपद पटकावले तर चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगलीच्या संघाने महिला गटात विजेतेपद पटकावले.
कन्या महाविद्यालय, मिरज आयोजित शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय बुद्धिबळ स्पर्धा दिनांक ३० व ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. श्री. राजू झाडबुके यांचे हस्ते झाले. यावेळी सांगली विभागीय क्रीडा परिषद सचिव प्रा. हर्षकुमार पाचोरे उपस्थित होते. त्याच बरोबर विविध महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक तसेच मोठ्या संख्येने खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील विविध २० महाविद्यालयातील पुरूष गटात ४७ खेळाडूंनी तर महिला गटात १९ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. पुरूष गटाचे ७ राऊंड तर महिला गटाचे ४ राऊंड पार पडले.
या स्पर्धेत पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बुधगाव यांचे कडून दिला जाणारा पुरूष गटातील विजेतेपदाचा कायम फिरता चषक वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली संघाने पटकाविला तर महिला गटातील विजेतेपदाचा कायम फिरता चषक चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगलीच्या संघाने पटकाविला.
त्याच बरोबर कन्या महाविद्यालय, मिरज कडून प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांचे सौजन्याने सर्वसाधारण विजेतपदाची ट्रॉफी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली या संघाने पटकाविली. तर सर्वसाधारण उपविजेतपदाची ट्रॉफी चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली या संघाने पटकाविला. त्याच बरोबर सर्व महिला व पुरुष गटातील १ ते ६ क्रमांकाच्या विजयी खेळाडूंचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांचे सौजन्याने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उल्हास माळकर यांचे मार्गदर्शन मिळाले. स्पर्धेचे संयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. बाबासाहेब सरगर यांनी केले. पंच म्हणून रोहित पोळ व सदानंद चोथे यांनी काम पाहिले. या स्पर्धा पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे सदस्य डॉ. जे. पी. चंदनशिवे, प्रा.वी.वाय. वनमोरे , प्रा. विश्वनाथ व्होनमोरे, प्रा. रमेश कट्टीमनी यांचे सहकार्य मिळाले. महाविद्यायातील प्राद्यापक वर्ग, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
*महिला गट निकाल - एकूण राऊंड ४*
१) श्रद्धा कदम - के. बी. पी. कॉलेज, इस्लामपूर - प्रथम क्रमांक
२) गायत्री रजपूत - एम.जी.कन्या महाविद्यालय, सांगली - द्वितीय क्रमांक
३) अर्पिता कारंडे - वाय.सी. कॉलेज, इस्लामपूर - तृतीय क्रमांक
४) अदिती कुलकर्णी -चिंतामणराव महाविद्यालय, सांगली- चतुर्थ क्रमांक
५) वैष्णवी कणसे - वॉलचंद कॉलेज ऑफ इंजि., सांगली- पाचवा क्रमांक
६) साक्षी पाटील - व्ही.पी.इन्स्टिट्युट, मिरज - सहावा क्रमांक
*पुरूष गट निकाल - एकूण राऊंड ७*
१) अभिजीत बिलपे - वॉलचंद कॉलेज ऑफ इंजि., सांगली- प्रथम क्रमांक
२) निषाद बगाडे - वॉलचंद कॉलेज ऑफ इंजि., सांगली- द्वितीय क्रमांक
३) आशिष सुतार - वॉलचंद कॉलेज ऑफ इंजि., सांगली- तृतीय क्रमांक
४) हरवर्धन शिंदे - आर.आय.टी. कॉलेज, साखराळे- चतुर्थ क्रमांक
५) शाहरुख कुरणे - डॉ. पतंगराव कदम महा. सांगलीवाडी- पाचवा क्रमांक
६) ऋषिकेश मोहिते - राजे रामराव महाविद्यालय, जत - सहावा क्रमांक
Tournament Report
No comments:
Post a Comment
Thanks you