Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Saturday, May 21, 2022

ऑलम्पिक स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया

ऑलम्पिक स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया

अलीकडच्या काळात, अर्ध्याहून अधिक भारतीय कुस्तीपटू हारियाणा राज्यातून आले आहेत, यापैकी बहुतेक रत्नांनी भारतासाठी पदके जिंकली आहेत आणि बजरंग पुनिया या पॅकमध्ये आघाडीवर आहे.

बजरंग पुनिया हा भारतीय कुस्तीपटू आहे. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने ६५ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले.

वैयक्तिक माहिती

  • नाव:- बजरंग पुनिया
  • वडिलांचे नाव:- बलवान सिंह पुनिया
  • आईचे नाव:- ओम प्यारी पुनिया
  • व्यवसाय:- फ्रीस्टाइल रेसलर / कुस्तीपटू
  • जन्मतारीख:- २६ फेब्रुवारी १९९४
  • जन्म ठिकाण:- खुदान गाव, झज्जर हरियाणा
  • मूळ:- गाव हरियाणा
  • धर्म:- हिंदू
  • प्रशिक्षकाचे नाव:- अमझारियास बेंटिनिडी
  • राष्ट्रीयत्व:- भारतीय
  • उंची:- १.६६ मी
  • वजन:- ६५ किलो
  • वैवाहिक स्थिती:- विवाहित (२५ नोव्हेंबर २०२०)
  • पत्नीचे नाव:- संगीता फोगट
  • नेटवर्थ:- $५ दशलक्ष (अंदाजे)
  • संघांसाठी खेळले:- भारतीय राष्ट्रीय कुस्ती संघ, हरियाणा संघ गुरुकुल भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र

प्रारंभिक जीवन

बजरंग पुनिया यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९९४ रोजी भारताच्या हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील खुदान गावात झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्याने कुस्ती खेळायला सुरुवात केली आणि हा खेळ खेळण्याकरता त्याचे वडील बलवान सिंग यांनी त्याला प्रोत्साहन दिले.

त्यांना भारतातील सोनीपत येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) च्या प्रादेशिक केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले. पुढे कर्नालमधील हरियाणा पोलिस अकादमीत तो सराव करत होता. सध्या ते कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली गोहना येथे सराव करत आहे.

बजरंग पुनियाचा विवाह संगीता फोगट यांच्या सोबत २५ नोव्हेंबर २०२० रोजी झाला आहे. संगीता फोगोट या देखील कुस्तीपटू आहेत.

कुस्ती कारकीर्द

  • बजरंग पुनियाने २०१३ च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत ६० किलो गटात कांस्यपदक जिंकल्यानंतर प्रथम प्रसिद्धी मिळवली.
  • एका वर्षानंतर त्याने एक पाऊल पुढे टाकले आणि २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ६१ किलो गटात रौप्य पदक जिंकले.
  • २०१४ राष्ट्रकुल स्पर्धा: ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६१ किलो वजनी गटात रजत पदक मिळवले.
  • आशियाई खेळ: दक्षिण कोरियातील इंचीऑन येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६१ किलो वजनी गटात रजत पदक मिळवले.
  • आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : अस्ताना, कझाकिस्तान येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६१ किलो वजनी गटात रजत पदक मिळवले.
  • २०१७ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६० किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.
  • २०१८ राष्ट्रकुल स्पर्धा: गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.
  • आशियाई खेळ : बजरंगने इंडोनेशिया येथील जकार्ता येथे झालेल्या २०१८ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंगने ६५ किलो वजनी गटात अंतिम फेरीत जपानच्या ताकातानी दाईईची या मल्लास हरवून सुवर्ण पदक मिळवले.
  • जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा: बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात अंतिम सामन्यात जपानी मल्ल ताकुतो ओतुगारो याच्याकडून १६-९ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे बजरंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.या पदामुळे जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दोन वेळा पदके मिळवणारा तो पहिलाच भारतीय ठरला.

बजरंग पुनिया टोकियो ऑलिम्पिक २०२०

बजरंग पुनिया यांनी ६५ किलो गटात चांगली कामगिरी करून टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्वतःला पात्र केले. आणि उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांचा पराभव झाला, पण तरीही ते कांस्यपदकासाठी झुंजले. ज्यात त्यांनी ८-० ने विजय मिळवला. आणि कांस्य पदक भारतासाठी जिंकले. भारतासाठी ही खूप अभिमानाची बाब होती.

पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार (२०१९)

बजरंग पुनिया पदक आणि अचीवमेंट

            वर्ष             स्पर्धा                           वजन गट         पदक

  • २०१३      एशियन चॅम्पियनशिप     ६० किलो.    कांस्य पदक
  • २०१३      वर्ल्ड चॅम्पियनशिप          ६० किलो      कांस्य पदक
  • २०१४      एशियन चॅम्पियनशिप      ६१ किलो     रौप्य पदक
  • २०१४.    कॉमनवेल्थ गेम्स              ६१ किलो      रौप्य पदक
  • २०१४.     एशियन गेम्स                  ६१ किलो       रौप्य पदक
  • २०१६      कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप  ६५ किलो       सुवर्ण पदक
  • २०१७.     एशियन चॅम्पियनशिप      ६५ किलो       सुवर्ण पदक
  • २०१७       कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप  ६५ किलो      सुवर्ण पदक
  • २०१७      वर्ल्ड U-23 चॅम्पियनशिप   ६५ किलो       रौप्य पदक
  • २०१७      एशियन इंडोर अँड मार्शल आर्ट गेम्स  ७० किलो  सुवर्ण पदक
  • २०१८       एशियन चॅम्पियनशिप       ६५ किलो       कांस्य पदक
  • २०१८       कॉमनवेल्थ गेम्स              ६५ किलो       सुवर्ण पदक
  • २०१८       वर्ल्ड चॅम्पियनशिप            ६५ किलो       रौप्य पदक
  • २०१८       एशियन गेम्स                   ६५ किलो       सुवर्ण पदक
  • २०१९      एशियन चॅम्पियनशिप        ६५ किलो       सुवर्ण पदक
  • २०१९      वर्ल्ड चॅम्पियनशिप             ६५ किलो       कांस्य पदक
  • २०२०       एशियन चॅम्पियनशिप         ६५ किलो       रौप्य पदक
  • २०२०      ऑलंपीक गेम्स             ६५ किलो      कांस्य पदक
  • २०२१      एशियन चॅम्पियनशिप          ६५ किलो        रौप्य पदक

ब्रँड ॲम्बेसिडर

  • अमृतांजन हेल्थकेअर ने टोकियो २०२० ऑलिम्पिक पदक विजेते – वेटलिफ्टिंग रौप्यपदक विजेती मीराबाई चानू आणि कुस्तीतील कांस्यपदक विजेते बजरंग पुनिया – यांना पेन मॅनेजमेंट श्रेणीतील उत्पादनांसाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून घोषित केले आहे.
  • दोन्ही ऑलिम्पिक चॅम्पियन कंपनीच्या अ‍ॅडव्हान्स बॉडी पेन मॅनेजमेंट उत्पादनांना मान्यता देतील, ज्यात पाठदुखी रोल-ऑन, सांधे स्नायू स्प्रे आणि पेन पॅचेस यांचा समावेश आहे.
  • चानू आणि पुनिया या उत्पादनांसाठी – टेलिव्हिजन आणि डिजिटल अशा अनेक मोहिमांमध्ये देखील काम करतील.


(खासाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त पहिला राज्य क्रीडा दिन दिनांक १५ जानेवारी २०२२ पासून प्रत्येक आठवड्याला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंची माहितीची सृंखला शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत आपल्यासाठी सुरू केली आहे. आपणास ही संकल्पना कशी वाटली या बद्दल जरुर प्रतिक्रिया द्यावी.)

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity SOFTBALL tournament 2024-25

 दिनांक ३० एप्रिल ते ४ मे २०२५ रोजी विश्वकर्मा सिम्हापूरी युनिव्हर्सिटी, नेल्लूर, आंध्रप्रदेश येथे होत असलेल्या अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धे...