Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Sunday, May 15, 2022

ऑलम्पिक स्टार जिद्दी बॉक्सर : लव्हलिना बरगोहाँइ


ऑलम्पिक स्टार जिद्दी बॉक्सर : लव्हलिना बरगोहाँइ


लवलिना बोर्गोहेन (२ ऑक्टोबर, १९९७) ही एक भारतीय हौशी मुष्टियोद्धा आहे. तिने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.मेरी कोम आणि विजेंद्र सिंगनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मुष्टीयुद्धात पदक मिळवणारी ती तिसरी भारतीय आहे. मीराबाई चानू आणि पी. व्ही. सिंधू यांच्यापाठोपाठ बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक मिळवून, लव्हलिना बरगोहाँइने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडविला आहे. उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीकडून पराभव पत्करावा लागला असला, तरी जगभरातील अव्वल बॉक्सरच्या यादीत स्थान पटकाविण्याच्या तिच्या कामगिरीचे मोल देशासाठी मोठे आहे. विजेंदर कुमार (२००८) आणि मेरी कोम (२०१२) यांच्या पंक्तीत ती जाऊन बसली आहे. लहानपणापासून प्रचंड संघर्ष करून लव्हलिनाने मिळविलेले यश सर्व प्रेरक आहे. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात तिच्या वडिलांचे छोटे दुकान होते. लहानपणी वडिलांनी आणलेल्या मिठाईच्या कागदावर महान खेळाडू महंमद अली यांचे छायाचित्र पाहून, तिनेही आपल्या कारकीर्दीची स्वप्ने रंगविली. जुळ्या बहिणी लिचा आणि लिमा यांच्याकडे पाहून तिने 'किक बॉक्सिंग' खेळण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणींमुळे 'ट्रॅक सूट' किंवा 'डाएट'साठीही तिच्या कुटुंबीयांची ओढाताण होत असे; मात्र तिने हार मानली नाही आणि 'किक बॉक्सिंग'मध्ये पुढे राष्ट्रीय पदकही मिळविले. कारकीर्दीच्या संधी पाहून तिने 'बॉक्सिंग' खेळण्यास सुरुवात केली. नववीत असताना तिचा खेळ पाहून, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) आसाम प्रादेशिक केंद्रात प्रशिक्षणासाठी निवड झाली. 'इंडियन ओपन बॉक्सिंग चॅम्पियनशिप'स्पर्धेत तिने एक रौप्य आणि एक सुवर्णपदक मिळविले. आशियाई स्पर्धा आणि 'वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप' स्पर्धेतही कांस्यपदक मिळविले. अर्जुन पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला आहे. 'मुली काही करू शकत नाहीत,' असे शेरे तिच्याही कानी येत होते; परंतु 'अशी कामगिरी करून दाखवा, की सर्वजण तुम्हाला लक्षात ठेवतील,' असे सांगणाऱ्या आईचे स्वप्न तिने साकार केले आहे. लव्हलिनाच्या यशाला आणखीही कंगोरे आहेत. काही काळापूर्वी क्रिकेटवर केंद्रित झालेल्या साऱ्या क्रीडाविश्वाचे लक्ष आता अन्य खेळांकडे जात असून, त्यामध्येही जागतिक दर्जाचे खेळाडू घडविण्याची भारताची क्षमता सिद्ध होत आहे. त्याबरोबरच अनेक राज्यांतील खेळाडूंच्या या यशोगाथा हे देशात क्रीडासंस्कृती सर्वदूर रुजत असल्याचेही सुचिन्ह मानावे लागेल. 

वैयक्तिक माहिती

  • नाव:- लवलीन बोरगोहेन
  • जन्म:- २ ऑक्टोबर १९९७
  • वय:- २४
  • शहर:- बरोमुखिया, बारपथार
  • राज्य:- गोलाघाट, आसाम, भारत
  • उंची:- १.८१ मीटर (५ फूट ११ इंच)
  • वजन:- 69 किलो (152 पौंड)
  • वजन:- वर्ग वेल्टरवेट
  • वडिलांचे नाव:- तिकेन बोरगोहेन
  • आईचे नाव:- ममोनी बोरगोहेन
  • भावंड:- लिमा आणि लीना
  • प्रशिक्षक (Coach):- मोहम्मद अली कमर
  • निव्वळ संपत्ती:- १ – ५ दशलक्ष डॉलर्स
  • सर्वोच्च क्रमवारी Ranking:- ३ (सप्टेंबर २०२०)
  • राष्ट्रीयत्व:- भारतीय

कोण आहे लवलिना

लोव्हलिना बोर्गोहेन ही एक भारतीय बॉक्सर आहे जी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

 २०२० वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना लोव्हलिना बोर्गोहेन एक अप्रतिम सामना खेळली आहे. लोव्हलिना बोर्गोहेन ही ६९ किलोग्रॅम महिला गटातून खेळणारी एक अतिशय मजबूत बॉक्सर आहे.

वैयक्तिक आयुष्य

लवलिनाचा जन्म २ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. ती मूळची आसामच्या गोलाघाटमधील आहे. तिचे पालक टिकेन बोरगोहेन आणि मॅमोनी बोरगोहेन आहेत.तिचे वडील टिकेन यांचा लघुउद्योग आहे. मुलीच्या क्रीडा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी बरीच आर्थिक कसरत केली.लवलिनाच्या मोठ्या जुळ्या बहिणी लिचा आणि लिमा यासुद्धा राष्ट्रीय स्तरावर किकमुष्टियुद्ध खेळलेल्या आहेत. लवलिना हिनेसुद्धा किकबॉक्सर म्हणूनच तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, पण संधी मिळताच ती मुष्टियुद्धाकडे वळली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने लवलिनाच्याच बारपाथर कन्या विद्यालयात चाचणी शिबीर भरवले, त्यामध्ये ती सहभागी झाली. त्यात प्रशिक्षक पदुम बोरो यांनी तिची निवड केली.२०१२मध्ये त्यांनी तिचे प्रशिक्षण सुरू केले आणि कालांतराने महिलांचे मुख्य प्रशिक्षक शिव सिंह यांनी तिला प्रशिक्षण दिले.

बॉक्सिंग करिअर

लवलीन देखील एक किकबॉक्सर म्हणून तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली, पण जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा बॉक्सिंगकडे वळली.भारतीय क्रीडा प्राधिकरणाने तिच्या हायस्कूल बारपथार गर्ल्स हायस्कूलमध्ये चाचण्या घेतल्या, जिथे बोर्गोहेनने भाग घेतला.बॉक्सिंगच्या मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी आणि बॉक्सिंगमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी 2012 पासून SAI STC गुवाहाटी येथे प्रसिद्ध प्रशिक्षक पदुम चंद्र बोडो यांनी तिची दखल घेतली आणि निवड केली.तिला नंतर संध्या गुरुंगने प्रशिक्षक केले.

व्यावसायिक यश

फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या इंडिया ओपन या पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिनाने केलेल्या कामगिरीच्या जोरावर तिची २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली. इंडिया ओपनमध्ये तिने वेल्टरवेट श्रेणीत सुवर्ण पदक जिंकले होते.

नोव्हेंबर २०१७ मध्ये व्हिएतनाम येथे आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकले, आणि जून २०१७ मध्ये तिने अस्ताना येथे प्रेसिडेंट्स कप स्पर्धेतही कांस्य पदक जिंकले.

लवलिनाने नंतर जून २०१८ मध्ये मंगोलियाची राजधानी असलेल्या उलानबातारमध्ये उलानबातार चषक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि सप्टेंबर २०१८ मध्ये पोलंडमधील १३व्या आंतरराष्ट्रीय सिलेसियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.

नवी दिल्लीत झालेल्या एआयबीए महिला विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये 23 नोव्हेंबर २०१८ रोजी वेल्टरवेट (६९ किलो) श्रेणीत तिने कांस्य पदक जिंकले.

बोर्गोहेनची २०१९ मध्ये ३ ते १३ ऑक्टोबर २०१९ दरम्यान उलन उडे, रशिया येथे होणाऱ्या दुसऱ्या महिला विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी विना चाचणी थेट निवड झाली.

उपांत्य फेरीत तिचा चीनच्या यांग लिऊ हिने ६९ किलो श्रेणीत २-३ अशा अंतराने पराभव केला आणि तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

मार्च २०२० मध्ये आशिया-ओशनिया मुष्टियुद्ध ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत लवलिनाने उझबेकिस्तानच्या माफ्टुनाखोन मेलीवाचा ५-० असा पराभव केला, आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ६९ किलो श्रेणीत तिचे स्थान पक्के केले. यासोबतच ती ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी आसामची पहिली महिला खेळाडू बनली.

टोकियो ऑलिम्पिक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बोर्गोहेनने ६९ किलो वजनी गटात जर्मन मुष्टीयोद्धा नादिन अपटेझ हिला पहिल्या फेरीत हरवले तर उप-उपांत्य फेरीत माजी जागतिक विजेत्या तैवानच्या चेन नीन-चीनला हरवून ऑलिंपिकमध्ये पदक निश्चित केले.

पुरस्कार |

राष्ट्रीय पुरस्कार

  • बॉक्सिंगमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला
  • २०२१ मध्ये खेलरत्न पुरस्कार , भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान.

बक्षिसे

२०२० टोकियो उन्हाळी ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल –

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ₹ २५ लाख
  • आसाम सरकारकडून ₹ १ कोटी
  • भारत सरकारकडून ₹ ३० लाख
  • आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीकडून ₹ ३ लाख

अर्जुन पुरस्कार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बॉक्सिंगमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी तीला अर्जुन पुरस्कार प्रदान केला.


(खासाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त पहिला राज्य क्रीडा दिन दिनांक १५ जानेवारी २०२२ पासून प्रत्येक आठवड्याला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंची माहितीची सृंखला शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत आपल्यासाठी सुरू केली आहे. आपणास ही संकल्पना कशी वाटली या बद्दल जरुर प्रतिक्रिया द्यावी.)

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity SOFTBALL tournament 2024-25

 दिनांक ३० एप्रिल ते ४ मे २०२५ रोजी विश्वकर्मा सिम्हापूरी युनिव्हर्सिटी, नेल्लूर, आंध्रप्रदेश येथे होत असलेल्या अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धे...