Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Monday, December 27, 2021

समस्या का हल '’समस्या का हल '’और हर ‘' मेहनत का फल '’ जरुर मिलता है ..!

 समस्या का हल '’समस्या का हल '’और हर ‘' मेहनत का फल '’ जरुर मिलता है ..!

एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना,
घरातली जेष्ठ माणसे, सगळ्या घराला,
त्यातल्या नव्या सुनेला, आपल्या ताब्यात
ठेवायला बघतात,
तेव्हा संघर्ष अटळ असतो.

कुठल्याही मानसिक युद्धामध्ये, तिच व्यक्ती जिंकते,
जी शत्रुपेक्षा मनाने अधिक शक्तीशाली,
जास्त संयमी आणि तेवढीच बेफिकीर असते.
जे लोक छोट्या-छोट्या गोष्टी मनाला लावुन घेतात.

आपोआपच त्यांचा फोकस आपल्या ध्येयावरुन,
आपल्या स्वप्नांवरुन, हरवतो,
आणि सततच्या ताणतणावाने त्यांच्या जीवनातला
आनंदही ते गमावुन बसतात.

ही काही तुमची एकटीची समस्या नाही,
आज आधुनिक भारतातल्या, त्यातही स्पेशली
मध्यमवर्गीयातल्या, लाखो-करोडो तरुण स्त्रिया
‘' कौटुंबिक धुसफुस आणि कुरबुरी '’
ह्या मानसिक तणावात जगत आहेत.

यावर काही उपाय आहेत का ?
हो निश्चितच आहे्त,
कारण.
हर ‘' समस्या का हल '’
और .....
हर ‘' मेहनत का फल '’ जरुर मिलता है ..!

ही टॅगलाईन आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*१) #कडु_गोळ्यांचा_डोस :-*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आपण जेव्हा आजारी पडतो,
तेव्हा आपल्याला वेगवेगळी औषधे दिली जातात,
त्यातल्या काही गोळ्या अत्यंत कडु असतात, आपल्याला त्यांचा तिटकारा येतो,
पण बरे होण्यासाठी ते घेणेही आवश्यक असते.
आपण ती गोळी गटकन गिळुन टाकतो.
तसचं दुःखाचंही आहे.
अहंकाराच्या रोगातुन बरे होण्यासाठी
आपल्या प्रत्येकाला कसल्या ना कसल्या दुःखाची
कडू गोळी दिली जाते,
तेव्हा ती चघळत बसण्याऐवजी
गटकन गिळुन ते दुःख विसरुन जाणारे,
व्यावहारीक शहाणे असतात.
माझ्या वाट्याला हे दुःख का आले ..?
असा जेवढा त्रागा करु, तेवढा त्या दुःखाचा
परिणाम वाढत जातो.
स्वेच्छेने नाही घेतली तर जबरदस्तीने ते औषध
आपल्याला घ्यावेच लागते.
आणि हसत-हसत त्या दुःखाचा स्वीकार केला की,
त्याची तीव्रता एकदम कमी होवुन जाते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*२) #बहिरे_व्हा :--*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आपला द्वेष करणाऱ्या व्यक्तींचा
आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही,
त्यासाठी अशा व्यक्तींना दुखवु नका,
पण त्यांच्याशी जास्त संपर्क, वादविवाद टाळा.
घरातल्या वडीलधाऱ्यांची सेवा अवश्य करा
पण जेवढ्यास तेवढे बोला...!
त्यांचा अनादर किंवा अपमान अजिबात करु नका,
कारण आपण जे देतो ते फिरुन परत आपल्याकडे येते,
हा सृष्टीचा नियम आहे,
पण त्यासोबतच स्वतःच्या आत्मसन्मानालाही जपा.
आपल्याला जाणीवपुर्वक त्रास देणाऱ्या
प्रत्येक व्यक्तिंपासुन चार हात दुर रहा.
कमीत कमी बोला...
जेवढं बोलाल तेवढं मात्र हसुन खेळुन बोला.
मुकपणेच त्यांची अधिकची सेवा करा.
कर्तव्यात अजिबात कसुर करु नका ..
पण त्यासोबतच, त्यांना आपल्या आयुष्यात आणि
आपल्या मनामध्ये अजिबात स्थान देऊ नका,
असं समजा,
ते तुमच्यासाठी आस्तित्वातच नाहीत.
जोपर्यंत आपण आधिकार देत नाही ..
तोपर्यंत कोणीही आपल्याला हर्ट करु शकत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*३) #मन_करा_रे_प्रसन्न :--*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुम्हाला काय करायला आवडते ?
तुमचा फेव्हरेट टाईमपास काय आहे ?
आपलं संपुर्ण लक्ष त्या गोष्टींकडे वळवा.
संगीत, एखादी कला जोपासणं, रांगोळी, स्वयंपाक,
झाडं लावणं, चांगली पुस्तकं, चालायला जाणं,
यातलं काहीही चालेल ..👍
टी. व्ही. पासुन तेवढं दुर रहा.
लवकर उठा, लवकर झोपा.
स्वतःच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या..!👍

नवनवीन मैत्रीणी जोडा, लोकांमध्ये मिसळा,
जुना नात्यांना फ्रेश करा, एका दिवसाच्या सहलीवर जा,
ह्या छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात रंग भरतील.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*४) #अफर्मेशन_म्हणा :--*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सर्वात महत्वाचे रोज सकाळ-संध्याकाळ
न चुकता ध्यान करा, आणि आठवलं तेव्हा, दिवसातुन,
शक्य तितक्या जास्त वेळा, शक्य असल्यास
मोठ्याने मनःपुर्वक प्रार्थना करा..!

“माझे इच्छित शिक्षण सहज पुर्ण झाले आहे,
माझे उत्पन्न दहापटीने वाढले आहे,
माझे व्यकिमत्व दिवसेंदिवस अधिकधिक आनंदी,
प्रसन्न आणि आकर्षक होत आहे,
मी कुटुंबातील सर्वांवर प्रेम करते,
सगळे माझ्यावर प्रेम करतात, मी सुखी आहे,
मी निरोगी आहे, माझी सर्व स्वप्ने पुर्ण झाली आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*५) #मला_वचन_द्या :--*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मी तुम्हाला सर्व प्रॉब्लेम्समधुन बाहेर काढेन,
त्या बदल्यात मी काही मागितले ..
तर मला काही द्याल का ? 🙏🙏

#आज_ २७_डिसेंबरला मला एक वचन पाहीजे आहे...!🙏

ऊदयापासुन येणारे पुढचे १७ दिवस,
म्हणजे १४ जानेवारी २०२२ पर्यंत,
कितीही वाईटात वाईट परिस्थिती आली ,
तरी तुम्ही हसत-हसत त्याचा सामना करणार आहात.👍👍

येणारे १७ दिवस ..
तुम्ही कोणाशीही भांडणार नाही.

येणारे १७ दिवस ...
तुम्ही कोणीही हिरमुसणार नाही, रडणार नाही,
त्रागा करणार नाही.

येणारे १७ दिवस ...
तुम्ही सकाळ~दुपार~संध्याकाळ
आनंदी असल्याचं नाटक कराल.

येणारे १७ दिवस ...
प्रत्येक कुटुंबीयाला कसलं ना कसलं सरप्राईज द्याल,
कधी त्यांना छोटीशी भेटवस्तु द्या,
कधी त्यांना घेऊन बाहेर फिरायला जाल...

म्युझीक लावुन डान्स करण्यामध्ये सुध्दा
एक वेगळीच मजा असते.

जास्तीत जास्त मौन पाळा, 👍
शब्दांपेक्षा स्पर्शांची भाषा बोला. 👍
आपल्या प्रत्येकाच्या मनातली प्रेम करण्याची
शक्ती जागृत होवुन,
सर्वांचं आयुष्य सुख, समृद्धी ...
आणि समाधानाने भरुन जावे,
अश्या मनःपूर्वक शुभेच्छा ...!!

💐💐💐🌼🌼🌼💐💐💐🌹🌹🌹💐💐💐
🙏🙏🙏

साभार .......

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...