Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Tuesday, December 28, 2021

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी - सूर्यनमस्कार व योगाभ्यास......

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सूर्यनमस्कार व योगाभ्यास......

 आपण आनंद कमी करत आहे आणि समस्या वाढवीत आहोत... 

त्याचा सरळ-सरळ  परिणाम आपल्या स्वास्थ्यावर पडत आहे.

#सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीराची अनावश्यक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होईल आणि शरीरात चुस्ति- स्फूर्ती कायम राहण्यास मदत  होईल...

सूर्यनमस्कार  सर्वांना व्यवहारिक अडिअडचणी, विवंचना, अनारोग्य, तणाव व नकारात्मकता यांचे परिणाम कमी होण्यासाठी हजारो वर्षांपासून अतिशय उपयुक्त व प्रभावी ठरलेला आहे....* 

*सर्वसिद्धी यश, कीर्ती,आयु व आरोग्य या सर्व गोष्टींमध्ये यश मिळण्यासाठी दररोज सकाळी "सूर्यनमस्कार" घालावेत ....*  

योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात  अवलंब करणे, हे आनंदी आणि निरोगी जीवनाचे रहस्य ठरू शकते.

  "संतोष", समाधानाचे महत्व शिकवते.  "अपरिग्रह"  आपल्याला लोभीपणा किंवा अधिकाधिक मिळवण्याची आकांक्षा,

 जे तणाव आणि चिंतेचे कारण असू शकते, 

त्यावर मात करण्यास मदत करते.

योगाचे यम आणि नियम आपल्याला पोषक आहार घेण्यास आणि निरोगी जीवनशैली जगण्यास मदत करतात, 

ज्यामुळे चिंता आणि तणावावर मात करण्यासाठी मदत होते. 

 आनंदी मन आणि निरोगी शरीर, साध्य करण्यास सूर्यनमस्कार व योगासने मदत करतात. सूर्यनमस्कार व आसने शरीर व मनातून तणाव व नकारात्मकता घालवण्यास मदत करतात.


#सूर्यनमस्कारांबरोबरचं.....

1धनुरासन

2मत्स्यासन

3जानूशिरासन

4सेतुबंधासन

5मार्जरासन

 6पश्चिमोत्तानासन

7 हस्तपादासन

9 अधोमुखासन

10 शीर्षासन

11 शवासन

योगाभ्यासाशेवटी, 

श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने चिंता निर्माण करणाऱ्या अनावश्यक विचारांच्या गोंधळातून मन मुक्त होते.

@

#कपालभाति प्राणायाम

#उदगिथ प्राणायाम (ओंकार🕉️)

अनुलोम-विलोम प्राणायाम 

 शरीर व मनातून ताणतणाव घालवण्यासाठी हे प्राणायाम प्रभावी आहेत.

@

शरीर व मनाला काही क्षण सखोल विश्रांती देण्यासाठी #योगनिद्रेत झोपावे. 

हे तंत्र (टेक्निक) शरीरातील घातक द्रव्ये, तणाव,  बाहेर टाकण्यास मदत करते.

@

गोंधळलेल्या मनाला आराम देण्यसाठी, तुम्हाला निश्चलता आणि मनःशांती देण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात आजूबाजूच्या छोट्या, क्षुल्लक गोष्टींनी मन कसे व्यापून राहते याची जाणीव करून घेण्यासाठी, 

#ध्यान हे एक उत्कृष्ट साधन (टेक्निक) आहे. 

 ..........

भूतकाळातील वाईट गोष्टींची काळजी करून आणि  भविष्याची विनाकारण चिंता करण्यामुळे आपण आपला वर्तमान वाया घालवीत असतो. 

आपल्या उणीवा दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे .

कोणताही मनुष्य सर्वगुणसंपन्न असू शकत नाही.

 प्रसन्न राहिल्याने आणि आनंदी स्वभावामुळे सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होण्यास मदत होते. 

सकारात्मक विचार जीवनाची जमापुंजी आहे. 

 शरीर सक्रिय ठेवण्यातच खरा फायदा आहे. सामर्थ्यानुसार शरीराला कामे देणे गरजेचे आहे. त्यामुळे कामे तर होतील त्याशिवाय वाईट विचारदेखील मनात येणार नाही.

आपल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करत राहणे गरजेचे असते. 

मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे. परंतु चूक झाल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात उशीर करता कामा नये.

 जीवनात चुकामधून शिकण्याची सवय लावणे गरजेचे आहे. त्यामुळेच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकतात .

जीवनात आपला उद्देश निश्चित करून तो पूर्ण करण्यासाठी योग्य प्रकारच्या योजना आखाव्यात. 

स्वत:ला नेहमी व्यस्त ठेवावे. कधीही रिकामे राहू नये. कारण रिकामे डोके सैतानाचे घर असते. तुम्ही रिकामे नसले तर तणाव निर्माण होणार नाही. 


#हसणे #शरीरासाठी  एक चांगला #तणावमुक्तीचा #व्यायाम #आहे.


#प्रार्थना हे चिंतामुक्त राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट साधन आहे. दैनंदिन प्रार्थनेची सवय लावल्याने, *गायत्रीमंत्रजप किंवा भजन गायल्याने* तुम्ही सकारात्मक शक्तीने भरून जाता आणि त्यानी मन स्थिर होण्यात मदत होते. शिवाय जास्तीत जास्त हसण्याचा (चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवण्याचा) जाणीवपूर्वक प्रयत्न करा. ते तुमच्यात क्षणार्धात आत्मविश्वास, निश्चिंतता आणि सकारात्मकता रुजवते. आत्ता ह्या क्षणी हसून बघा.

 

 आप की जय हो!!!

    🙏🕉️🙏

साभार .. forwarded link

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...