शारीरिक व्यायामाच्या बाबतीत स्त्रिया मागे आहेत ही बाब अधोरेखित व्हायला कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही.पहाटे ५-७ या वेळेत आपल्या आजू बाजूच्या व्यायामासाठी पोषक असणाऱ्या ठिकाणांवर नजर टाकली तर व्यायाम करणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत किती कमी आहे हे लक्षात येईल.
शारीरिक हालचालींच्या व्यायामात स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात स्पष्ट झालं आहे.घर सांभाळून/नोकरी करून अॕक्टि व्ह राहता येत नाही असे खूप साऱ्या महिलांचे मत आहे.घरी स्वयंपाक करणे,कचरा काढणे, मुलांना सांभाळणे व हे सगळं केल्यावर ऑफिसलाही जात असाल तर स्वत:ला हेल्दी व ऍक्टिव्ह विमेन म्हणून घेऊ शकता पण प्रत्यक्षात तसं असेलच असं नाही.अनेक स्त्रिया व्यायाम न करण्याची सबब,आम्ही घरातली कामं करतो अशी देतात.ही कामं उरकतानाच इतकं थकायला होतं की वेगळा व्यायाम करण्याची गरजच राहत नाही. असे म्हणतात मात्र असा विचार करणं आजारांना निमंत्रण देणारं आहे.घरची कामं म्हणजे च व्यायाम अशी स्त्रियांची समजूत असते.निरोगी तसंच फिट राहण्यासाठी घरची कामं पुरेशी होतात असं त्यांना वाटतं मात्र हे तितकसं खरं नाही.
अनेक देशातल्या माणसांची आरोग्य पाहणी केली आली.४ पैकी १ प्रौढ व्यक्ती हवी तेवढं सक्रिय नसल्याचं हा अहवाल सांगतो.काही देशांमध्ये ३ पैकी १ व्यक्ती सक्रिय नसल्याचं स्पष्ट झालं आहे.शारीरिक हालचाल कमी असणाऱ्या माणसांना हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक आहे. डायबेटिस होण्याचं प्रमाणही जास्त असतं.काहींना शारीरिक हालचालींच्या अभावी कॅन्सरही होण्याची शक्यता असते.शारी रिक हालचाली,व्यायामाचा अभाव असेल तर माणसाच्या मेंदूवरही परिणाम होण्याची शक्यता असते.या अहवाला नुसार,भारतातल्या ४३%स्त्रिया शारीरिकदृष्ट्या कमी हालचाल असणाऱ्या आहेत.देशातल्या पुरुषांमध्ये हे प्रमाण २३.५% आहे.शारीरिक दृष्ट्या सगळ्यात निष्क्रिय होण्याची नामुष्की कुवेतवर ओढवली आहे.शारी रिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्यांचं सर्वाधिक प्रमाण युगांडात सगळ्यांत जास्त आहे.हा अह वाल म्हणजे १६८ देशांपैकी घेण्यात आलेल्या ३५८ सर्वेक्ष णांचं निष्कर्ष आहे.
शारीरिकदृष्ट्या अॕक्टिव्ह म्हणजे नक्की काय?
राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, शारीरिक हालचाल म्हणजे ज्यात संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो.दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर वेगवान चालणं, वॉटर एरोबिक्स,सायकल चालवणं,टेनिस खेळणं हे सर्व शारीरिक हालचालींमध्ये येते. घरातली कामं म्हणजे शारीरिक दृष्ट्या हालचाल असलेला व्यायाम नव्हे प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किमान १५० मिनिटं व्यायाम करणं गरजेचं आहे.त्यामुळे अशा व्यक्तींना शारीरिकदृष्ट्या अॕक्टिव्ह म्हटलं जाऊ शकतं.एरोबिक्स,चालणे इतर गतीजन्य व्यायाम प्रकारा मुळे हृद्याचे ठोके वाढतात.श्वास वरखाली होतो,शरीरात उष्णता निर्माण होते.हे सगळं शारीरिक दृष्ट्या सक्रिय असण्यात मोडतं.
शॉपिंग,स्वयंपाक करणं,घरात छोटी-मोठी कामं करणं म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्रिय होत नाही.या सगळ्या गोष्टींमुळे फायदा होत नाही असं नाही. या कामांमुळे शारीरिक हालचा लींचं स्वरुप बदलतं.
कोणाला किती व्यायामाची आवश्यकता?
५-१८ वयोगटातल्या मुलामुलीं साठी दररोज तासभर शारीरिक दृष्ट्या दमवणारी हालचाल आवश्यक आहे.
१९-६४ वयोगटातील प्रौढांसा ठी प्रत्येक आठवड्याला १५० मिनिटं शरीराची सर्वांगीण हालचाल असा व्यायाम आवश्यक आहे.
६५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी आठवड्याला १५० मिनिटं व्यायाम व आठवड्या तून २ दिवस ताकदीसाठी देणं आवश्यक मानलं गेलं आहे.
व्यायामात नक्की काय येतं?
वेगानं चालणं,पोहणं,सायकल चालवणं,टेनिस,हायकिंग,स्केट बोर्डिंग,व्हॉलीबॉल,बास्केटबॉल या सगळ्यांमधून मजबूत शारीरिक व्यायाम घडतो.मात्र याचा नक्की अर्थ काय?
व्यायाम का आवश्यक?
राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार जी माणसं नियमितपणे व्यायाम करतात त्यांच्यामध्ये
हृद्यविकाराचा झटका आणि हृद्याशी संबंधित विकारांचं प्रमाण ३५% नी कमी होतं.
- व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाइप 2 डायबेटिस होण्याची शक्यता ५०% नी कमी होते.
- कोलोन/रेक्टल कॅन्सर होण्याची शक्यता ५०% नी कमी होते.
- स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता २०% नी कमी होते.
- आकस्मिक निधन होण्याचा धोका ३०% नी कमी होते.
- हाडांचा आजार होण्याचं प्रमाण ८३% नी कमी होते.
महिला शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय का?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये शारीरिक हालचालीचं,व्यायामाचं प्रमाण कमी असल्याचं स्पष्ट झालं आहे.सर्वसाधारणपणे महिला पुरुषांपेक्षा जास्त सक्रिय असतात असा समज आहे. घरगुती कामांच्या जबाबदाऱ्या असूनही शारीरिक हालचालीत महिला मागे आहेत.या निष्कर्षा साठी काही कारणं आहेत. घरात मुलांना सांभाळण्याची जबाबदारी सर्वसाधारणपणे स्त्रियाच सांभाळतात.यामध्ये त्यांचा बहुतांश वेळ जातो. स्त्रियांनी व्यायामासाठी तसंच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वेळ देण्यासारखी सामाजिक मोकळीक आपल्याकडे नाही. त्यामुळे स्त्रिया शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यात मागे राहतात.
समाजाची ही मानसिकता आता सजग स्त्रियांनी आपल्या अनुकरणातूनच बदलली पाहिजे.लॉकडाऊनच्या काळात सूर्यनमस्कार,योगासने सारखा व्यायाम करून शारीरिक दृष्ट्या सक्षम ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.वयाच्या ५० व्या वर्षा नंतर आपल्या भारतात मध्यम वर्गीय स्त्रिया प्रत्येक बाबतीत परावलंबी होतात असं चित्र आहे,नवरा/ मुलगा यांच्यावर अवलंबून मोजून मापून जगण्यात काय हशील. त्यामुळे प्रत्येक वयाच्या स्त्रियांनी ज्या दिवशी व्यायाम करायला पाहिजे असं वाटत त्या दिवशी उठून व्यायाम करायला सुरुवात केली पाहिजे.स्वयंपूर्ण आयुष्याकडे एक दमदार पाऊल टाकले पाहिजे...
Nice
ReplyDeleteCorrect Information
Thanks