सांगली विभागीय बेसबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
मिरज : दि. २४ जानेवारी २०२० शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सांगली विभागीय बेसबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे संयोजन कन्या महाविद्यालय, मिरजने केले होते. स्पर्धेचे उदघाटण चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एस.बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी खेळाडूंच्या मार्गदर्शनात बोलताना सांगितले की, ''खेळातून एक चांगला नागरिक घडतो हे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, खेळ हा खिलाडूवृत्तीने खेळावा व प्रत्येक खेळाडूचा मान राखला पाहिजे." सदर स्पर्धेसाठी सांगली जिल्हातून नऊ पुरुष व महिला संघाने सहभाग नोंदवला.
या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पुरूष मिरज महाविद्यालयाने प्रथम क्रमांक, एसीएस कॉलेज, पलूस द्वितीय क्रमांक, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज तृतीय क्रमांक, एएससी कॉलेज, रामानंदनगर चतुर्थ क्रमांक मिळविला. तसेच महिला विभागात मिरज महाविद्यालयाने प्रथम क्रमांक, एसीएस कॉलेज, पलूस द्वितीय क्रमांक, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज तृतीय क्रमांक, कन्या महाविद्यालय, मिरज चतुर्थ क्रमांक मिळवला. सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण मा.प्राचार्य डॉ.एम.एस. बापट , आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राजू झाडबुके, जेष्ठ प्रा.सुधीर वाटवे यांच्या हस्ते पार पडले, प्रसंगी प्रथम क्रमांक महिला संघास सौ. विजय रमेश सिंहासने यांच्याकडून ''सिंहासने कायम फिरता चषक" देवून गौरवण्यात आले. तर प्रथम क्रमांक पुरूष संघास कै. दत्तू आप्पा बनसोडे यांच्या स्मरणार्थ प्रा.एन.डी. बनसोडे यांच्या कडून ''बनसोडे कायम फिरता चषक" देवून गौरवण्यात आले. या प्रसंगी सांगली विभागीय क्रीडा स्पर्धाचे सचिव प्रा.अशोक कदम, विविध महाविद्यालयातून आलेले शारीरिक शिक्षण संचालक प्रा.व्ही.बी.पाटील,प्रा.संजय पाटील,प्रा.अमित माने,प्रा.मंगेश दौंडे,प्रा.प्रदिप पाटील,प्रा.डॉ.गणेश सिंहासने, प्रा.मुज्फर लगिवाले उपस्थित होते. या स्पर्धेचे संयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्रा.बाबासाहेब सरगर, प्रा.विनायक वनमोरे यांनी केले.
No comments:
Post a Comment
Thanks you