Annual Sports 202-23
Activity Report
Annual Sports Winner 2019-20
*दि. 1 जानेवारी पासून कन्या महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा व विविध कला आणि बौद्धिक स्पर्धांना सुरवात*
*राष्ट्रीय खेळाडू प्रा. सौ. अनिता गाडगीळ-जोगळेकर व दामिनी पथक प्रमुख सौ. रंजना बेडगे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उदघाटन*
मिरज: दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा व स्नेहसंमेलन दि. १ जानेवारी ते ९ जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. दि. १ रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले. प्रमुख पाहूण्या व उद्घाटक म्हणून महाविद्यावयाची १९८४ च्या बॅचची माजी विद्यार्थीनी व राष्ट्रीय विद्यापीठ बास्केटबॉल खेळाडू मा.सौ. अनिता जोगळेकर तर विशेष अथिती म्हणून मिरज दामिनी पथकाच्या प्रमुख मा. साै. रंजना बेडगे व त्यांच्या सहकारी कु.हिना मुल्ला उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राजू झाडबुके होते. सुरवातीस प्रमुख अथितींच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी महाविद्यालयातील यावर्षी सेवानिवृत्त होणारे जेष्ठ प्राध्यापक श्री.एम.जी. पाटील सर, श्री.एम.जी.कोष्टी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कु.आदिती चौगुले, कु. नेहा कोरवी, कु. मनिषा नंदिवाले यांचा नुकत्याच ग्लाल्हेर येथे झालेल्या वेस्ट झोन विद्यापीठ हॅन्डबॉल स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल, शिवाजी विद्यापीठ हॉकी सराव शिबारासाठी निवड झाल्याबद्दल कु. सुप्रिया माने, कु. सना नदाफ हीने राष्ट्रीय तांग सुडो स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्या बद्दल तसेच कु. साक्षी ठोंबरेची विभागीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल या सर्व खेळाडूंचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रा. गाडगीळ-जोगळेकर यांनी, विद्यार्थिनींनी फक्त पुस्तकी किडा बनून न राहता कला, क्रीडा अश्या विविध क्षेत्रात पारंगत झाले पाहिजे. खेळाडू होण्यासाठी खडतर मेहनत केली तरच चांगली खेळाडू म्हणून आपण नावारुपास येऊ शकतो. या खेळाचा पुढील आयूष्यात करिअर म्हणून निवड करण्यास काहीच हरकत नसल्याचे प्रतिपादन केले. दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस नाईक, सौ. रंजना बेडगे यांनी सोशिअल साईट्स वरून मुलींची होणारी फसवणूक, विद्यार्थिनीकडून मोबाईलचा होणारा अति व चुकीचा आणि त्याचे दुष्परिणामबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच आपल्या बाबतीत अशा वाईट घटना घडत असतील किंवा कोणी घडवत असतील तर त्वरित दामिनी पथकास संपर्क करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य झाडबूके सर यांनी महाविद्यालयाच्या आजपासून सुरू होणाऱ्या क्रीडा व कला महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थीनींनी उत्साहाने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. शेवटी महाविद्यालयाची राष्ट्रीय विद्यापीठ हॅन्डबॉल खेळाडू कु. अदिती चौगुले हिने सर्व विद्यार्थिनींना क्रीडा स्पर्धेची शपथ दिली.
या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.श्री. बाबासाहेब सरगर व प्रा.सौ.मृदुला कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. तुषार पाटील यांनी मानले. तर सुत्रसंचालन प्रा. रमेश कट्टीमणी यांनी केले. कार्यक्रमास कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. मंजिरी सहस्त्रबुद्दे, पर्यवेक्षिका प्रा.डॉ. सुनिता माळी, वरिष्ठ व कनिष्ठ विभागाच्या स्नेहसंमेलन चेअरमन प्रा.सौ. मानसी शिरगांवकर व प्रा.सौ. नलिनी सुर्यवंशी तसेच विद्यार्थीनी स्नेहसंमेलन प्रतिनिधी कु.लक्ष्मी सलगर तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग सर्व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
Thanks you