Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Friday, December 13, 2019

मिरजेच्या कन्या महाविद्यालयास हँडबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद

*मिरजेच्या कन्या महाविद्यालयास  हँडबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद*










दैनिक लोकसत्ता दि.25/12/2019


मिरज : पेठ वडगाव येथे दि. ११ डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठांतर्गत पार पडलेल्या इंटरझोनल हँडबॉल स्पर्धेत मिरजेतील दि मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयाच्या संघाने भरीव कामगिरी करत सलग दूसऱ्या वर्षी उपविजेतेपद मिळवले.
      शिवाजी विद्यापीठांतर्गत  इंटरझोनल हँडबॉल स्पर्धेचे आयोजन यावर्षी विजयसिंह यादव कॉलेज, पेठ वडगाव यांनी केले होते. या स्पर्धेत  सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हातील एकूण दहा  संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. चव्हाण मॅडम यांनी केले.
            उद्घाटनाचा पहिला सामना कन्या महाविद्यालय, मिरज व श्रीमती कस्तूराबाई वालचंद कॉलेज, सांगली यांच्यात झाला. या सामन्यात कन्या महाविद्यालयाच्या संघाने श्रीमती कस्तूराबाई वालचंद कॉलेजचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत १० विरूद्ध ०९ गोल या फरकाने विजय नोंदवला. या सामन्यात अदिती चौगुले या खेळाडूने ५ तर नेहा कोरवीने ४ गोल नोंदवीले. यानंतर  उपांत्य सामन्यात के.व्ही. महाविद्यालय, वाई संघावर कन्या महाविद्यालयाच्या संघाने ३ विरूध्द १० गोल या फरकाने विजय नोंदवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात आदिती चौगुले, नेहा कोरवी व मनिषा नंदिवाले यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम स्पर्धेत अतितटीच्या सामन्यात मनिषा नंदिवाले, आदिती चौगुले, गोलिकपर करिश्मा तारलेकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपदावर कन्या महाविद्यालयाचे सलग दूसऱ्या वर्षी नाव कोरले.
संघातील खेळाडू खालीलप्रमाणे: अदिती चौगुले,नेहा कोरवी, मनिषा नंदिवाले, सुप्रिया माने, निता सन्नाप्पा, करिश्मा तारलेकर, तनुजा माळी, अंबिका बाबर, स्वाती इंगळे, सना नदाफ-पिंजारी, निकिता सकपाळ, साबिया मणेर, सुमैय्या सय्यद, प्रियांका खोत, अर्चना शेरेकर, माँसाहेबी मुजावर इ.
विजेत्या संघास महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.श्री. बाबासाहेब सरगर, सौ.मृदुला कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राजू झाडबूके, संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर मराठे, सेक्रेटरी सुधीर गोरे यांचे प्रोत्साहन मिळाले. कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. मंजिरी सहस्त्रबुद्धे, पर्यवेक्षिका डॉ. सुनीता माळी, जिमखाना समिती सदस्य प्रा. एम. जी. पाटील, प्रा. व्ही. वाय. वनमोरे यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in Shivaji University Sangli Zonal CHESS (W) tournament 2024-25

 Participate in Shivaji University Sangli Zonal CHESS (W) tournament 2024-25