Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Sunday, April 21, 2019

शारीरिक शिक्षण मोठं करा,आपोआप प्रत्येक खेळ मोठा होईल...


      
             लहान बाळाला जसं सुर्याच्या कोवळ्या उन्हात थोडं झोपवलं जातं त्यामुळे त्या लहान बाळाच्या हाडांची वाढ होईल आणि चेहऱ्यावर तेज प्राप्त होण्यास मदत होते, ज्याप्रमाणे  लहान बाळाला सूर्याच्या कोवळ्या उन्हात झोपवलं जातं तसंच जर *शारीरिक शिक्षण* हे अगदी(2 वर्षे) लहान वयातच  शिकवलं गेलं तर शारीरिक सुदृढता विकास त्याचा लहान वयापासूनचं होत तो क्रीडापटू तयार होवु शकतो ही ताकद फक्त शारीरिक शिक्षणात आहे,कारण या लहान वयातच  मुलांच्या शारीरिक क्षमतेत बदल हा सतत घडत असतो आणि शारीरिक विकास होत असतो,हे समाजातील प्रत्येक घटकाने लक्षात घेऊन जर शारीरिक शिक्षणास प्रथम प्राधान्यक्रम दिला तर येणाऱ्या प्रत्येक ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत फक्त दोन पदक मिळवणार नाही तर बद्दल पदकांची संख्या 100 ते 130 च्या घरात जाईल असं मला वाटतं आणि विचार केला तर नक्कीच बरोबर आहे,2016 च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये भारताची परिस्थिती लक्षात घेतली तर शारीरिक शिक्षण हे तळागळापासूनचं आज प्राथमिक, शाळेपासून शारीरिक शिक्षण राबविण्याची गरज आहे,पण खंत नक्कीच आहे की आजही अनेक शाळेत विद्यार्थ्यांचे  शारीरिक शिक्षण मूल्यमापन फक्त कागदावर होते प्रत्यक्ष मात्र मैदानावर होत नाही याची मात्र नक्कीच खंत आहे,हे सुध्दा एक कारण ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक मिळवणं कारण असू शकतो.......खरं तर येणाऱ्या 2020,2024,2028 च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुद्धा दूर नाहीत,जवळजवळ 2019 च्या शेवटच्या टप्प्यात 2020 च्या टोकियो(जपान) ऑलिम्पिक मध्ये भारताचे खेळाडू कशा पद्धतीने आपला खेळ करतील यावर नक्कीच चर्चा होईल,पण या चर्चेला कधी उधाण प्राप्त होतं हे पाहण्यासारखं आहे,ह्या 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि पदकांची लयलूट करावी यासाठी सर्व सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना  शुभेच्छा देतो...
                         प्राथमिक          माध्यमिक,उच्चमाध्यमिक शाळेतील *शारीरिक शिक्षण हे उत्तम असा योध्दा*(खेळाडू) तयार करण्याचे एकमात्र गुरुकुल आहे,कारण ह्या गुरुकुलात असं शिक्षण दिलं जात की आयुष्यात कितीही मोठे संघर्ष उभे असू द्या त्या संघर्षाना सामना करण्याची ताकद फक्त या गुरुकुलाच्या माध्यमातून मिळालेली असते, त्याचबरोबर मला नक्कीच आनंद होईल की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व केंद्रीय इंग्रजी शाळेत (CBSE) अगदी चांगल्या प्रकारे शारीरिक शिक्षण राबविण्याच्या प्रयत्न करत आहे त्याबद्दल मी त्या शाळा संस्थाचालकांचे अभिनंदन, खरं तर मी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना माझा मुळीच विरोध नव्हता,फक्त माझा विरोध होता तो अधिक प्रमाणात फी आणि मुलांचे वय न बघता त्यांचं पाठीवरचे अप्रमाणित पुस्तकांचं ओझं यालाच माझा खास विरोध होता आणि तो विरोध आजही कायम आहे,पण आजही काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शारीरिक शिक्षण हे नावाला आहे हे पण विसरून चालणार नाही.बऱ्याच काही प्रमाणात महाराष्ट्रात हे चित्र सध्या आहे पण असो,काही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उत्तम प्रकारे शारीरिक शिक्षण व्यवस्था सुरू  आहे,याबद्दल ही चर्चा हवी या इंग्रजी शाळांनी अभ्यासक्रमा-बरोबरचं शारीरिक शिक्षणाला प्रथम स्थान दिलं आहेचं,या इंग्रजी शाळांनी शारीरिक शिक्षण शिक्षकांची व प्रशिक्षकांची संख्या ही विद्यार्थी संख्येला साजेशी ठरेल अशीच प्रमाणात आहे. त्याबद्दल मी त्या इंग्रजी शाळा प्रशासनाचे खूप-खूप अभिनंद....आमच्या आदिवासी ग्रामीण भागात सुद्धा अशा काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत की त्यांनी शारीरिक शिक्षणाला व खेळाला अतिशय महत्त्व दिलं त्याबद्दल त्यांचं ही मनापासून कौतुक करतो, ## शारीरिक शिक्षण(क्रीडा साहित्य रूम) व शारीरिक शिक्षण शिक्षक, प्रशिक्षक यांचे प्रमाण वाढवत त्यांनी शारीरिक शिक्षण म्हणजे नेमकं काय ..? आहे हे विद्यार्थ्यांच्या पालकांना पटवून दिलं याबद्दल ही अजिबात मला शंका नाही....खरंच मी अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अभिनंदन करायला मला नक्कीच आवडेल.

        अनेकांनाचा आजही असा गैरसमज आहे,की शारीरिक शिक्षण आणि खेळ(क्रीडा) हे अतिशय वेगळे विषय किंवा विरुद्ध दिशेने वाटचाल करतात, पण मी असा गैरसमज करून घेणाऱ्या माझ्या प्रिय मित्रांना सांगू इच्छितो की एका नाण्याच्या दोन जशा बाजू असतात तशाच *शारीरिक शिक्षण आणि खेळ(क्रीडा)एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.* शारीरिक शिक्षण हे ज्या मुलांना अगदी प्राथमिक अवस्थेत(लहान वयात) शारीरिक हालचाली करणे,शारीरिक क्षमता,आरोग्य सवयी अशा शिकवलेल्या असेल तर ती मुलं उत्कृष्ट क्रीडापटू होऊ शकतात,खरं तर उत्कृष्ट क्रीडापटू जर तयार करायचा असेल तर शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण हे 100% राबविण्यात यावं कारण *आपण जोपर्यंत शारीरिक शिक्षण मोठं करणार नाही तोपर्यंत खेळ मोठे होणार नाही....* काही जण असं वक्तव्य करतात की शारीरिक शिक्षणामुळे मुलांचा काय फायदा होतो,उलट मुलांचा वेळ वाया जातो असे ही काही बेअक्कली लोकं आहेत,आणि तेचं लोकं म्हणतात की भारताचे खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत का पदक मिळवू शकत नाही असेही काही नमुने आहेत, अशा लोकांशीही मी संवाद साधण्याचा खूप प्रयत्न केला/चर्चा ही करून पाहिली, पण त्यांना असंच वाटतं की शारीरिक शिक्षणाचा फायदा काय..? पण माझं उत्तर त्यांच्या प्रश्नांना 100% बरोबर होतं ते म्हणजे *"शारीरिक शिक्षणावर मुलांचं भवितव्य अवलंबून आहे आणि खेळ ही अवलंबून आहे"* पण असो त्यांच्या नादी मी जास्त लागलो नाही,कारण त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा आपलं कर्तव्य आणि काम करत राहणं हेंच शारीरिक शिक्षणाला मोठं करू शकतं.... यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करणंच मला योग्य वाटलं... प्राथमिक, माध्यमिक शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण राबविण्यासाठी जे शारीरिक शिक्षण क्रीडाशिक्षक प्रयत्न करत आहे,त्यांना मानाचा मुजरा कारण अशाच शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण राबविल्यामुळे *खेलो इंडिया* स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा नैसर्गिक खेळ हा डोळ्यांसमोर चित्र उपस्थित करत होता की हेचं 2020 च्या टोकियो(जपान) 2024/2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवतील.... शालेय स्तरावर राबविण्यात आलेल्या शारीरिक शिक्षणामुळे मुलांच्या हालचाली ह्या विविध खेळासाठी पूरक ठरत असतात,ह्या शालेय स्तरावरचं मुलांना कोणत्या खेळात अधिक आवड आहे आणि तो त्या खेळात काय करू शकतो हे ओळखणारा शारीरिक शिक्षण क्रीडाशिक्षक हा सतत मुलांना मैदानाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करत असतो,शाळेत शारीरिक शिक्षण म्हटलं की मुलांमध्येही एक वेगळाच आनंद आणि जोश असतो जो त्यांना मैदानाकडे आकर्षित करत असते,विद्यार्थी हा शारीरिक शिक्षणाच्या तासांत सर्वांत जास्त आनंदी असतो असं एका शिक्षणाधिकारी च्या सर्वेक्षण  म्हटलं गेलं होतं......

                 आजच्या घडीला  भारतातील अनेक राज्यांनी *खेळाला* अधिक महत्त्व देत, त्यासाठी नवनवीन प्रयोग करून *क्रीडा धोरण* ठरविले त्यात क्रीडासुविधा, खेळाडू योजना, TOP टेन सारखी अनेक योजना राज्यस्तरावर राबविण्यात येत असल्या तरी भारताचं ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी फारशी सुधारलेली दिसून येत नाही,त्याचं महत्वाची बाब म्हणजे  क्रीडा क्षेत्रात होणारा भ्रष्टाचार(यावर भ्रष्ट क्रीडा अधिकारी या लेखात सविस्तर वर्णन केलं आहे) ग्रामीण भागावर दुर्लक्ष आणि *महत्त्वाचं कारण म्हणजे शारीरिक शिक्षणाला दिले गेलेले दुय्यम स्थान*  महाराष्ट्र राज्य सरकारने तर हद्दीच्या बाहेर कारनामे केली,पण *शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्र* ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे,हे सरकारनं लक्षात घ्यायला हवं,परंतु सरकार ऐकायला तयार नाही आणि वरून सरकार बोबलत फिरत असतं की इतक्या सुविधा देऊनही खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला मिळाला नाही,आहो सरकार साहेब तुम्हीच जर शालेय स्तरावर शारीरिक शिक्षणाला दुय्यम स्थान देऊन पेंच तर तुम्हीच निर्माण केला आहे...सरकारनं खरंच *शारीरिक शिक्षणव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे किंवा शारीरिक शिक्षण हा विषय अधिक सक्षम होण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या नेमणुका केला पाहिजे.
  
*"शारीरिक शिक्षण मोठं करा आपोआप प्रत्येक खेळ मोठा होईल हे माझं वैयक्तिक मत असलं तरी ते 100% बरोबर आहे असं मला वाटतं."*

शारीरिक शिक्षण हा विषय येणाऱ्या काळात उत्तम क्रीडापटू घडवू शकतो इतकी प्रचंड ताकद ह्या विषयात आहे..... म्हणून शारीरिक शिक्षण हा विषय शालेय स्तरावर जास्तीत-जास्त प्रमाणात राबविण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. !धन्यवाद

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...