Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Friday, April 19, 2019

रक्तगटाचा गरोदर राहण्यावर आणि मुलांच्या आरोग्य वर होणारा परिणाम

आरोग्य टिप्स

रक्तगटाचा गरोदर राहण्यावर आणि मुलांच्या आरोग्य वर होणारा परिणाम

     अनेकदा लग्नाआधी मुलाचा आणि मुलीचा रक्तगट देखील विचारात घेतला जातो. यामागे काही वैद्यकीय कारणे आहेत. आई-वडिलांचे रक्तगट जर एकाच गटातील पोझीटीव्ह आणि निगेटिव्ह मध्ये मोडत असतील तर ते प्रेग्नेन्सित अडथळे आणू शकतात. याविषयी अनेकजण जागृत नसतात आणि त्यामुळे पालकांच्या मनात अनेक प्रश्न येतात. पालकांचा रक्तगट बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो, ते कसे हे आपण या लेखाद्वारे पाहू.

रक्तगट, प्रतीजने आणि प्रतिपिंडे (अॅन्टीबाॅडीज)


मानवी रक्त हे ४ प्रकारच्या गटांमध्ये मोडते. A , B, AB किंवा O. रक्ताचे वर्गीकरण हे त्या रक्तपेशींवर उपस्थित असलेल्या प्रतीजनांवरुन केले जाते. प्रतीजने म्हणजे अ‍ॅन्टीजेनस्. हे आपल्या रक्तपेशींच्या पृष्ठभागावर उपस्थित असणारे एक प्रोटीन आहे. Rh factor म्हणजेच ‘ऱ्हेसस घटक’ हे देखील लाल रक्तपेशींवर उपस्थित असणारे एक प्रतीजन आहे.

आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती बाहेरून येणाऱ्या प्रतीजनांचा शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून शरीरात उपस्थित असणाऱ्या प्रतीपिंडांचा (अॅन्टीबाॅडीज) वापर करते. परंतु ‘Rh’ हे प्रतीजन मानवी शरीरासाठी हानिकारक नसते. ज्या व्यक्तींच्या रक्तात Rh प्रतीजन उपस्थित असते ते पोझीटीव्ह रक्तगटाचे असतात आणि ज्यांच्या रक्तात नसते ते निगेटिव्ह रक्तगटाचे असतात.

रक्त तपासणी करून घ्या.

तुम्ही जर गरोदर राहण्याचा विचार करत असाल तर आधीच तुमची आणि तुमच्या जोडीदाराची रक्त तपासणी करून घ्या. तुमच्या दोघांचा रक्तगट बाळाच्या आरोग्यावर परिणाम करतो. गर्भधारणेनंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतीचची स्थिती टाळण्यासाठी ही तपासणी करून घेणे गरजेचे ठरते.

गर्भधारणा

आई-वडिलांचा रक्तगट कोणताही असला तरीही सुरवातीला त्याचा परिणाम गर्भधारणेवर होत नाही. वेगळा रक्तगट असेल तरीही गर्भधारणा होते. मातेचा रक्तगट Rh निगेटिव्ह असेल तर त्यात प्रतीजने उपस्थित नसतात आणि जर वडिलांचा रक्तगट Rh पोझीटीव्ह असेल तर त्यात प्रतीजने उपस्थित असतात. गर्भधारणा झाल्यानंतर जर भ्रूणाच्या शरीरात Rh पोझीटीव्ह रक्तगटाचे म्हणजे वडिलांच्या गटाचे रक्त विकसित झाले तर या स्थितीत समस्या उद्भवतात.

आईचा रक्तगट Rh निगेटिव्ह असेल तर ?

यात आईचा रक्तगट खूप महत्वाचा ठरतो.

१. आईचा रक्तगट जर Rh निगेटिव्ह असेल आणि बाळाचा रक्तगट देखील Rh निगेटिव्ह विकसित झाला असेल, तर रक्ताच्या बाबतीत समस्या उद्भवत नाही. दोघांच्या रक्तात प्रतीजने नसल्यामुळे आईच्या शरीरातील प्रतिपिंडे गर्भातील भ्रुणाला इजा करत नाहीत.

२. आईचा रक्तगट जर Rh निगेटिव्ह असेल आणि गर्भातील बाळाच्या शरीरात Rh पोझीटीव्ह रक्तगटाचे रक्त विकसित झाले तर ते रक्त आईच्या रक्तात मिसळू शकते. अनेकदा असे होते. या स्थितीत आईच्या शरीरातील प्रतिपिंडे बाळाच्या शरीरातील रक्ताला प्रतीजने समजून त्यांच्यावर हल्ला करतात. आईचे शरीर गर्भातील भ्रुणाला शरीरातील अनावश्यक घटक मानायला लागते. यातून खालील स्थिती उदभवू शकतात.

आईच्या शरीरातील प्रतीपिंडे बाळाच्या रक्तातील लाल पेशींवर हल्ला करतात त्यामुळे बाळाच्या शरीरात अनेमिया ची स्थिती उद्भवते. या स्थितीस ‘हिमोलिटीक अनेमिया’ असे म्हणतात.

बाळाच्या आरोग्यावर अनेक घातक परिणाम होऊ शकतात जसे की मेंदूचे विकार, गंभीर आजारपण किंवा कधी कधी बाळ दगावू देखील शकते.

ही समस्या कशी रोखता येते ?

१. बाळाच्या शरीरातील रक्त आईच्या शरीरात मिसळण्याआधी Rh गटाची तपासणी तुम्ही करून घेऊ शकता.

२. अॅन्टिबाॅडी स्क्रीन’ या रक्ततपासणीद्वारे मातेच्या शरीराने बाळासाठी प्रतिपिंडे(अँटीबॉडी) तयार केली आहेत की नाही हे तपासले जाऊ शकते.

३. ह्रेसस इम्युनोग्लोबीन (RhIg) नावाचे इंजेक्शन देऊन मातेच्या Rh निगेटिव्ह रक्तात बाळाच्या Rh पोझीटीव्ह रक्ताबद्दलची संवेदनशीलता गोठवता येते.

RhIg कधी दिले जाते?

RhIg प्रसुतीच्या आधी आणि नंतर दिले जाते.

१. जर मातेच्या शरीराने बाळाच्या रक्तगटाने प्रभावित होऊन अजून प्रतिपिंडे (अँटीबॉडी)तयार केली नसतील तर साधारणतः सातव्या महिन्यापासून हे इंजेक्शन मातेला देण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. याद्वारे गरोदरपणाच्या उर्वरित काळात आईचे शरीर बाळाच्या रक्तगटाविषयी संवेदनशील बनत नाही.

२. प्रसुतीनंतर देखील बाळाचे रक्त मातेच्या रक्तात मिसळले गेले असेल तर हे इंजेक्शन दिले जाते.

३. ज्या गरोदरपणात हे इंजेक्शन दिले जाते ते त्याच गरोदरपणासाठी उपयोगी असते. दुसऱ्या वेळेस हीच स्थिती उद्भवल्यास परत RhIg परत द्यावे लागते.

४. गर्भपात होणे किंवा एक्टोपिक प्रेग्नेन्सी अशा स्थितीत देखील Rh निगेटिव्ह असणाऱ्या मातेला प्रतीजनांशी संवेदनशीलता टाळण्यासाठी हे इंजेक्शन देण्यात येते.

प्रतिपिंडे (अँटीबॉडी)तयार झाली तर काय होते?

मातेच्या शरीराने बाळासाठी प्रतिपिंडे तयार केल्यानंतर RhIg च्या इंजेक्शन चा प्रभाव होत नाही. अशावेळी बाळाच्या शरीरातील स्थितीवर लक्ष ठेवले जाते. प्रसूती वेळेवर झाल्यास बाळाच्या रक्तातील अपाय झालेल्या पेशी ब्लड-ट्रान्सफ्युजन करून निरोगी रक्ताने बदलल्या जातात. काही गंभीर केसेसमध्ये गर्भातच हे ब्लड-ट्रान्सफ्युजन केले जाते किंवा मुदतपूर्व प्रसूती करून ही प्रक्रिया पार पडली जाते.

आई-वडिलांचे रक्तगट

जवळपास ८५% स्त्रिया या Rh पोझीटीव्ह असतात आणि त्यामुळे ही समस्या कमी प्रमाणात आढळून येते. ही समस्या रोखण्यासाठी आई-वडिलांचे रक्तगट जुळायला हवेत. इथे आई व वडिलांच्या रक्तगटाच्या काही जोड्या दिल्या आहेत ज्या बाळाच्या आरोग्यासाठी अगदी योग्य आहेत.

- वडील A = आई A, AB .

- वडील B = आई B, AB.

- वडील O = आई O, A, B, AB

- वडील AB = आई AB

- वडील Rh पोझीटीव्ह = आई Rh पोझीटीव्ह

- वडील Rh निगेटिव्ह = आई Rh पोझीटीव्ह किंवा Rh निगेटिव्ह.

आई-वडिलांचा रक्तगट हा बाळाच्या गर्भातील विकासात महत्वाची भूमिका बजावतो. तुम्ही तुमचा रक्तगट जरूर तपासून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य ते निर्णय घ्या. 

🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...