Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Sunday, June 9, 2019

वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये

आज बहुतांश लोक सेलेब्ससारखी फिट बॉडी मिळविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात, मात्र अपेक्षित लाभ मिळत नाही. विशेषत: फिट बॉडीसाठी फक्त हार्ड वर्कआउट महत्त्वाचे नसून त्यानंतर काही नियमांचे पालन करावे लागते. तरच अपेक्षित फायदा मिळू शकतो. प्रत्येक सेलेब्स तज्ज्ञ फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाने वर्कआउट करतात शिवाय तज्ज्ञ डायटिशियनचे मार्गदर्शनही ते घेतात. त्यांचा वर्कआउटनंतर परफेक्ट डायट प्लॅन ठरलेला असतो आणि ते काटेकोरपणे पालनही करतात. मात्र बहुतांश लोकांना वर्कआउटनंतर नेमक कोणते नियम पाळावेत हेच माहित नसते. आपल्याकडून वर्कआउटनंतर अशा काही चुका होतात ज्यामुळे आपणास फिट बॉडी मिळत नाही. आज आपण जाणून घेऊया की, वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये.
योग्य डायटचा अभाव
वर्कआउटनंतर पौष्टिक आहार घेणे हे सकाळच्या नाश्त्याएवढेच महत्त्वाचे आहे. काही लोक एक्झरसाइजनंतर योग्य डायट घेत नाहीत, ज्यामुळे त्यांचे शरीर कमकुवत होते. यासाठी रोज जिममधून आल्यानंतर प्रोटीन शेकचे सेवन करावे. याशिवाय अंडे, फळ आणि हिरव्या भाज्यापाल्यांचा समावेश करावा.  
उशिरा जेवण करणे  
काही लोक जिममध्ये घाम गाळल्यानंतर बºयाच उशिरापर्यंत काहीच खात नाही, मात्र अशाने शरीरास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. एक्झरसाइजनंतर शरीरात काही पोषक तत्त्वे कमी होतात, ज्यांची भरपाई करण्यासाठी आहार घेण्याची आवश्यकता असते. 
* गोड पदार्थ सेवन न करणे  
वजन वाढू नये या भीतीने बरेच लोक गोड पदार्थांचे सेवन करणे पूर्णत: बंद करतात, मात्र शारीरिक यंत्रणा सुरळीत काम करण्यासाठी फॅटचीदेखील आवश्यकता असते. यासाठी गोड पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते.
* आहाराचे योग्य प्रमाण  
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात बरेच लोक खूप कमी प्रमाणात आहाराचे सेवन करतात आणि काही लोक बॉडी बनविण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आहार सेवन करतात. मात्र या दोन्ही सवयी चुकीच्या आहेत. यामुळे शरीरास फायद्याऐवजी नुकसानच होते. म्हणून अपेक्षित फायद्यासाठी आहाराचे प्रमाण योग्य असावे.   

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...