Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Wednesday, May 22, 2019

जसप्रीत बुमराह सर्वात भेदक गोलंदाज असण्यामागचं वैज्ञानिक कारण


जसप्रीत बुमराह सर्वात भेदक गोलंदाज असण्यामागचं वैज्ञानिक कारण



जसप्रीत बुमराह गेल्या एक दोन वर्षांमध्ये जगातल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक म्हणून नावारूपाला आला आहे. मुंबई इंडियन्ससाठीची कामगिरी असो किंवा विदेशामधली भारतीय संघाची कामगिरी असो बुमराहनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली आहे. एक दिवसीय सामन्यांच्या रँकिंगमध्ये तर बुमराह जागतिक स्तरावर अग्रस्थानी आहे. वेगवान गोलंदाजी, वैविध्य आणि गोलंदाजी करण्याची अनोखी शैली किंवा अॅक्शन ही बुमराहची शस्त्र मानण्यात येतात. चेंडू किती वेगानं टाकला जातो, सीमची स्थिती फलंदाजापासून लपवता येते का आणि किती उंचावरून बॉल हातातून सुटतो अशा अनेक बाबी जलदगती गोलंदाजांसाठी महत्त्वाच्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फलंदाजाला चकवण्यासाठी बॉलची मूव्हमेंट जलदगती गोलंदाजांसाठी सगळ्यात महत्त्वाची असते, जिच्या जोरावर गडी बाद होतात.


बुमराह १४० ते १४५ कि.मी. प्रति तास या वेगानं सातत्यानं गोलंदाजी करू शकतो, ज्यामुळे त्याची गणना जलदगती गोलंदाजांमध्ये होते. त्यात त्याची अत्यंत वेगळी अशी हाय-आर्म अॅक्शन फलंदाजांसाठी आणखी डोकेदुखी ठरते. बुमराह दोन्ही दिशांनी बॉल स्विंग करू शकतो त्यामुळे फलंदाजांना त्याची गोलंदाजी खेळताना फार सावध रहावं लागतं.
बुमराह फलंदाजांसाठी कर्दनकाळ का आहे याचा हे समजण्यासाठी क्रिकेट बॉलच्या एरोडायनॅमिक्सचा विचार करायला हवा असे सांगत आयआयटी कानपूरमधले एरोस्पेल इंजिनीअरिंगचे प्रोफेसर संजय मित्तल यांनी अभियांत्रिकीच्या माध्यमातून विश्लेषण केले आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये त्यांनी या संदर्भात सविस्तर लेख लिहिला असून त्याचा सारांश पुढीलप्रमाणे…
क्रिकेटचा बॉल हवेतून जाताना बॉलच्या सभोवती हवेचा एक पातळ असा पडदा तयार होतो. हा पडदा बॉलच्या पृष्ठभागापासून विशिष्टवेळी वेगळा होतो. बॉलच्या ज्या अंगाला हा पडदा किंचित उशीरा वेगळा होतो त्या बाजुला कमी दाब असतो. यामध्ये एक आणखी गोष्ट असते ती म्हणजे टर्ब्युलन्स किंवा जोरदार घुसळण. जर बॉलचा वेग कमी असेल तर घुसळण कमी असते बॉलचं वहन सुलभतेनं होतं. परंतु जसा वेग वाढतो तशी घुसळण व अनियमितता वाढते. आणि एका विशिष्ट वेगानंतर तर बॉलची मूव्हमेंट अत्यंत गोंधळसदृष्य घुसळणीत होते. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी चेंडू जास्त वेगवान असतो व घुसळण वाढलेली असते.

जलदगती गोलंदाज बॉलच्या सीमवर बोटं ठेवून बॉल सोडतात यामध्ये बॅकस्पिनचाही समावेश असतो. बॅकस्पिनचा चेंडूच्या घुसळणीवर व तो बाऊन्स होण्यावर विशेष प्रभाव असतो. सोबतची इलस्ट्रेशन बघितल्यावर या गोष्टीची कल्पना येईल. उजवीकडून डावीकडे बॉलची दिशा आहे. बॉल फलंदाजाच्या दिशेने जात असताना बॉलच्या खालच्या बाजुला जास्त दाब असतो व वरच्या बाजुला कमी दाब असतो. त्यामुळे चेंडूला वरच्या दिशेने दाब निर्माण होण्यास मदत होते, याला मॅग्नस फोर्स म्हणतात. यामुळे बॉल जास्त काळ हवेत तरंगतो व फलंदाजाला तो मारण्यास सुलभ ठरतो. परंतु बॉलचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग वाढला म्हणजे जर बॅकस्पिनचा प्रभाव जास्त असेल तर वेगळीच आश्चर्यकारक गोष्ट बघायला मिळते. त्यामुळे चेंडूची घुसळण वाढते, परंतु ती चेंडूच्या खालच्या बाजुला वाढते, जे या छायाचित्रात बी या ठिकाणी दाखवलंय. यामुळे वर बघितलं होतं ते चेंडूवरील दाबाचे प्रमाण उलट होते. याला रिव्हर्स मॅग्नस म्हणतात. या फोर्समुळे बॉल अत्यंत जलदगतीनं खालच्या दिशेनं जातो कारण चेंडूवरील दाबाची दिशा वरून खालच्या बाजुला असते. अत्यंत वेगानं खालच्या दिशेने झेपावणारा चेंडू खेळणं फलंदाजाला जड जातं. केवळ जलदगती गोलंदाज बॅकस्पिनचा प्रभावी वापर करून रिव्हर्स मॅग्नस इफेक्टचा लाभ घेऊ शकतात.
बुमराहचं वैशिष्ट्य म्हणजे तो १४५ किमी गतीनं गोलंदाजी करताना चेंडूचा रोटेशनल स्पीड १००० आरपीएम असतो. या दोन गोष्टींमुळे रिव्हर्स मॅग्नम इफेक्ट मिळतो. प्रा. संजय मित्तल व त्यांच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी कानपूरमध्ये नॅशनल विंड टनेल फॅसिलिटीमध्ये प्रयोग केले व ते या निष्कर्षाला आले आहेत. बुमाराहचे वेगवान चेंडू रिव्हर्स मॅग्नम इफेक्टमुळे अन्य गोलंदाजांपेक्षा त्वरेने जमिनीवर आदळतात आणि ते ओळखणं व खेळणं फलंदाजांना अवघड जातं.

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...