Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Friday, April 5, 2019

काय आहे ओव्हरहायड्रेशन आणि कसा करावा यापासून बचाव?



उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही.
By ऑनलाइन लोकमत

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही. उन्हाळ्या डिहायड्रेशनची समस्या होते हे तर तुम्ही अनेकदा ऐकलेच असेल पण कधी ओव्हरहाड्रेशन ऐकलंय का? जसं डिहायड्रेशन आरोग्यासाठी हानिकारक ठरतं तसंच ओव्हरहायड्रेशनही आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. चला जाणून घेऊ काय आहे ओव्हरहायड्रेशन...

किती पाणी पिणे गरजेचे?

पाण्याची गरज वय आणि शारीरिक श्रमानुसार बदलत राहते. म्हणजे जर तुम्ही असं काही काम करता ज्यात तुम्हाला फार जास्त घाम येतो तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे. पण जर असं नसेल तर तुमच्या शरीराला फार जास्त पाण्याची गरज पडणार नाही. पण सामान्य धारणा अशी आहे की, एका चांगलं आरोग्य असलेल्या व्यक्तीने एका दिवसात २ ते ४ लिटर पाणी प्यावं. विशेष स्थिती जसे की, जिम, एक्सरसाइज, जड मेहनत किंवा गरमीमुळे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. पण जर सामान्यपणे जर तुम्ही रोज ५ ते ६ लिटर पाणी पित असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर उलटा प्रभाव पडू शकतो.

जास्त पाणी पिणे का धोकादायक?

जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी सेवन करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. सर्वात मोठी बाब ही आहे की, अनेक लोक जास्त पाणी प्यायल्याने वजन वाढण्यालाही घाबरतात. पण मुळात आपलं वजन तेव्हाच वाढतं जेव्हा शरीरात फॅट जमा होतं. जमा झालेल्या फॅट सेल्समध्ये पाण्याचं प्रमाणही असतं. अशात जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी सेवन करत असाल तर किडनी पूर्ण पाणी शरीरातून बाहेर काढण्यास सक्षम नसते. शिल्लक राहिलेलं पाणी शरीरात इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स बिघडवतं. याने पाणी शरीरात जमा होतं आणि त्यामुळे वजन वाढतं. 

मेंदूला येऊ शकते सूज

द हेल्थ साईटनुसार, एका शोधात असं आढळलं आहे की, शरीरात जास्त प्रमाणात पाणी झाल्यावर सोडियमचं प्रमाण वेगाने कमी होऊ लागतं. सोडियमचं प्रमाण कमी झाल्याने मेंदूला सूज येऊ शकते. ही एक गंभीर समस्या होऊ शकते. शोधात असंही आढळलं की, जास्त पाणी प्यायल्याने शरीरात असामान्य रूपाने सोडियम कमी होऊ लागतं, त्यामुळे हायपोट्रिमियाचा धोका वाढतो. सोडियम एकप्रकारचं इलेक्ट्रोलाइट आहे, जे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण नियंत्रित करतं.

का पितात जास्त पाणी?

सामान्यपणे जास्त सोडियम आणि कमी पोटॅशिअमच्या सेवनने फार जास्त तहान लागते. मीठ सोडियमने तयार होतं, त्यामुळे जास्त मीठ खाणाऱ्यांना जास्त तहान लागते. मीठ सेल्समधून पाणी बाहेर काढतं. अशात जर तुम्ही जास्त मीठ खात असाल तर तुमच्या पेशी मेंदूला लवकर लवकर तहान लागण्याचा संकेत पाठवू लागते. 

लागोपाठ जास्त पाणी सेवन नको

जर एखाद्या दिवशी तुम्ही जास्त पाणी सेवन केलं असेल तर किडनी हळूहळू ते पाणी बाहेर काढण्याचं काम करत असते. २४ तासातच हे जमा झालेलं पाणी शरीराच्या बाहेर निघतं. पण जास्त पाणी पिणे हे तुमची रोजची सवय झाली असेल तर हे पाणी बाहेर काढण्यास किडनीला अडचण येते. याने किडनी फेल होण्याचाही धोका वाढू शकतो.

कसं घातक आहे ओव्हरहायड्रेशन

प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशनची समस्या होऊ लागते. ओव्हरहायड्रेशनचा थेट प्रभाव किडनीवर पडतो. किडनी आपल्या शरीरात पाणी फिल्टर करण्याचं काम करतात. जर तुम्ही रोज जास्त प्रमाणात पाणी पित असाल तर किडनींच्या कामावर ओझं जास्त होतं. ज्यामुळे पुढे जाऊन किडनी फेल होण्याचा धोका वाढू शकतो.


No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...