Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Tuesday, February 5, 2019

ट्रेकींगला जाताय? जरा सावध.


ट्रेकींगला जाताय? जरा सावध.
ट्रेकींगला जाताना आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजे.
1) किल्ल्याची माहिती. उदा. चढण सोप्पी, मध्यम, अवघड कि खुप अवघड
2) किल्ला सर (चढण्याची) करण्याची वेळ
3) किल्ल्यावर खायची व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय.
4) ज्या किल्ल्यावर ट्रेकींगला जायच आहे त्या किल्ल्यासंबंधी ज्यांनी त्या किल्ल्यावर ट्रेकींग केल आहे त्यांचा अनुभव विचारणे.
5) ट्रेक ग्रुपने करणार असाल तर आपल्याला ग्रुप मध्ये एखादा तरी अनुभवी ट्रेकवर असावा.
6) ग्रुपने ट्रेक करताना किल्ला चढताना आपसात स्पर्धा करू नये. एकत्र सर्वांना बरोबर घेऊन पुढे जात रहावे.
7) चढाई करताना एकमेकांना ढकलाढकली मस्ती टाळावी.
8. मोठ्या संख्येने ट्रेकला जाणार असाल तर ट्रेकच्या अगोदर एक दोघांनी तो किल्ला अगोदर जाऊन तेथील परिस्थिती पाहून यावी.
9) आपल्याला बॅगच वजन 2 kg पेक्षा जास्त नसावे. त्यात आत्यांतअवश्यक आशा गोष्ट असाव्यात.
उदा. पाणी बॉटल, ट्रेकिंग सूट, टॉर्च, स्लीपींग बॅग, शूज, एक्स्ट्रा सोक्स. आणि सीजननुसार रेनकोट किंवा स्वेटर.
10) शक्यतो किल्ल्यावर गाईड असतील तर नक्की घ्या आपण साधारण पूर्ण ट्रेक 10 - 15 हजार खर्च करतो व 500 रुपयांसाठी गाईड घेत नाही आणि मग भटकत राहतो इकडे तिकडे. वेळ वाईट असेल तर अडकून पडतो खतरनाक जागी.
11) सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमचा ट्रेक Successful करायचा असेल तर एक लिडर ठरवा व जो प्लॅन ठरवला आहे त्यानुसार लिडरला फॉलो करा.
12) 🙏 आपले किल्ले हा आपल्या छ. शिवाजी महाराजांनी व मावळ्यांनी स्वतःचे रक्त सांडून हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याची साक्ष देत आहेत तरी सर्वांना नम्र विनंती 🙏🙏 ट्रेकींगला गेल्यावर किल्ले स्वच्छ ठेवा व ट्रेकिंग मधील 10 - 15 मिनिटे किल्ले स्वच्छते साठी काढून ठेवा
Treking is not only the Enjoyment, but also it is a Testing Of How much I'm feet.

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...