आदर्श कुटुंब निर्माण करण्यामध्ये स्त्रीची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विशेष कक्षाचे उपकुलसचिव डॉ. पी. एस. पांडव यांनी केले. आज महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समितीने आयोजित केलेल्या "आदर्श कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीयांची भूमिका" या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राजू झाडबुके होते. आपल्या व्याख्यानात श्री पांडव पुढे म्हणाले, दुधामध्ये विरघळलेल्या साखरेचे जे स्थान असते त्याहीपेक्षा मोठे स्थान घरामध्ये स्त्रीचे असते. कुटुंबात वावरत असताना ती एक हेल्थ ऑफिसर, चांगली सहचारिणी, व्यवस्थापक, गुरू, आर्थिक नियोजक, संघटक, दिशादर्शक, स्वयंपाकी, मैत्रीण, फिलॉसॉफर अश्या अनेक भूमिका पार पाडत असते. सध्यस्थितीला बदलती व्यवस्था, प्रसार माध्यमांतुन चुकीचं अनुकरण, वाढत्या अवास्तव अपेक्षा, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव इत्यादीमुळे कुटुंबव्यवस्थेला तडा जात आहे. याचे चिंतन व आत्मपरीक्षण सर्वांनी करणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीच्या प्रमुख सौ. मानसी शिरगावकर यांनी केले, ओळख प्रा. विनायक वनमोरे यांनी करून दिली तर डॉ. कविता सुल्हयान यांनी आभार मानले.
काही क्षणचित्रे....
No comments:
Post a Comment
Thanks you