आज दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी Kanya Mahavidyalaya, Miraj. मध्ये शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने स्वातंत्र भारताचे पहिले ऑलिंपिकपदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले व महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. तसेच आज राज्य क्रीडा दिवस निमित्त महाविद्यालयात बॉडी मास इंडेक्स BMI तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी महविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक व प्रशासकीय सेवक वर्ग यांनी BMI तपासणी करुन घेतली. असा पध्दतीने अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आज राज्य क्रीडा दिवस व ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्यवाह श्री. राजू झाडबुके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ.बाबासाहेब सरगर, क्रीडा विभाग विद्यार्थी प्रतिनिधी कु. निकिता जाधव सर्व प्राध्यापक वर्ग व प्रशासकीय सेवक व र्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
Thanks you