सांगली विभागीय जलतरण महिला व पुरुष स्पर्धा 2021-22
शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय जलतरण स्पर्धेत पतंगराव कदम महाविद्यालय प्रथम
मिरज: शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय जलतरण स्पर्धा (पुरुष अणि महिला) सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे आयोजन मिरजेतील कन्या महाविद्यालयाने केले. स्पर्धेचे उदघाटन शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानीत मा. श्री. बापू समलेवाले यांच्या हस्ते झाले. यावेळी सांगली विभागाचे सचिव डॉ. महेश पाटील, प्रा. सुधीर वाटवे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी होत्या. स्वागत व प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक प्रा.बाबासाहेब सरगर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. विनायक वनमोरे यांनी करून दिला. आभार डॉ. जयकुमार चंदनशिवे यांनी मानले. उदघाटन प्रसंगी बापू समलेवाले यांनी खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत याची आवश्यकता असते. ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्या पूर्तीसाठी योग्य त्या पद्धतीने वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. खेळ हा शारीरिक तंदुरुस्तीसाठी महत्वाचा आहेच परंतु सध्या करिअर म्हणून खेळाला विशेष महत्व असल्याचे प्रतिपादन केले.
या स्पर्धेत सांगली विभागातील विविध महाविद्यालयातील खेळाडू स्पर्धक सहभागी झालेले होते. स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटासाठी ५०, १००, २००, ४००, ८००, १५०० मीटर फ्रीस्टाइल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, मिडले, मिडले रीले, रिले असे एकूण १९ प्रकार खेळविण्यात आले. या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवत श्रीधर देवेंद्र पाटील यांचे स्मरणार्थ डॉ.ज्ञानचंद्र श्रीधर पाटील यांचेकडून दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा सांघिक सर्वसाधारण विजेतपदाचा फिरता चषक सांगलीच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने पटकावला. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम सांघिक सर्वसाधारण विजेतपद - डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीवाडी, द्वितीय सांघिक सर्वसाधारण विजेतपद - बाबासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडी,
तृतीय सांघिक सर्वसाधारण विजेतपद - ए.एस. सी. महाविद्यालय, रामानंदनगर., वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद: वरद महादेव कदम (डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली) - पुरुष सर्वसाधारण विजेतेपद योगेश्वरी महादेव कदम (मिरज महाविद्यालय, मिरज) - महिला सर्वसाधारण विजेतेपद. वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद मिळविणाऱ्यांना महाविद्यालयामार्फत ट्रॉफी देण्यात आली.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रा. गंगाधर चव्हाण, प्रा. रमेश कट्टीमणी, प्रा.विश्वनाथ व्हनमोरे, प्रा. संतोष शेळके,प्रा. अक्रम मुजावर, श्री. नारायण कोळी विविध महाविद्यालयातून आलेले शारीरिक शिक्षण संचालक यांचे सहकार्य लाभले.
Activity Report
कार्यक्रम पत्रिका
Tournament Result
*दैनिक महासत्ता*
⭕ *शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय जलतरण स्पर्धेत पतंगराव कदम महाविद्यालय प्रथम*
![]() |
दैनिक जनप्रवास |
![]() |
दैनिक तरुण भारत पुरवणी पान 4 |
No comments:
Post a Comment
Thanks you