ऑलिम्पिक स्टार कुस्तीपटू सुशील कुमार
सुशील कुमार हे सुप्रसीध्द भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहेत. ६६ किलो वजनी गटात खेळतांना त्यांनी भारतासाठी २०१० मध्ये जागतीक कुस्ती स्पर्धेत सूवर्ण व २०१२ च्या लंडन ऑलंपिक मध्ये सिल्वर पदक आणि २००८ मध्ये बीजींग ऑलंपिक मध्ये ब्रॉंझ कांस्य पदक जिंकले.
सुशील कुमार हे पहिले भारतीय आहेत ज्यांच्याकडे व्यक्तिगत खेळाडु म्हणून दोन ऑलंपिक पदक आहेत.
सुशील कुमार यांनी २००८ मध्ये ऑलंपिक खेळात कांस्य पदक जिंकल्यानंतर त्याच्याकडून आशा वाढल्या होत्या. २००९ मध्ये त्यांच्या कामगिरीस पाहुन भारत सरकारने त्यांना खेळांचा सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
२०१० च्या फेब्रुवारीत त्यांनी जागतीक कुस्ती स्पर्धांमध्ये ६० किलो गटात सुवर्ण जिंकून भारताची शान वाढविली. ऑक्टोबर २०१० मध्ये Commonwealth Games मध्ये त्यानी ७४ किलो गटात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर २०१२ बीजींग ऑलंपिक मध्ये त्यांनी सिल्वर पदक जिंकले होते त्यानंतर सुशील कुमार यांनी जिंकलेले कुस्तीचे हे पदक होते. निश्चितच ही भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे.
फ्रीस्टाईल कुस्तीपटू सुशील कुमार यांचा जीवनपरिचय
सुशील कुमार हे सुप्रसीध्द भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहेत. ६६ किलो वजनी गटात खेळतांना त्यांनी भारतासाठी २०१० मध्ये जागतीक कुस्ती स्पर्धेत सूवर्ण व २०१२ च्या लंडन ऑलंपिक मध्ये सिल्वर पदक आणि २००८ मध्ये बीजींग ऑलंपिक मध्ये ब्रॉंझ कांस्य पदक जिंकले.
सुशील कुमार हे पहिले भारतीय आहेत ज्यांच्याकडे व्यक्तिगत खेळाडु म्हणून दोन ऑलंपिक पदक आहेत.
सुशील कुमार यांचा जीवनपरिचय
सुशील कुमार यांनी २००८ मध्ये ऑलंपिक खेळात कांस्य पदक जिंकल्यानंतर त्याच्याकडून आशा वाढल्या होत्या. २००९ मध्ये त्यांच्या कामगिरीस पाहुन भारत सरकारने त्यांना खेळांचा सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
२०१० च्या फेब्रुवारीत त्यांनी जागतीक कुस्ती स्पर्धांमध्ये ६० किलो गटात सुवर्ण जिंकून भारताची शान वाढविली. ऑक्टोबर २०१० मध्ये Commonwealth Games मध्ये त्यानी ७४ किलो गटात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर २०१२ बीजींग ऑलंपिक मध्ये त्यांनी सिल्वर पदक जिंकले होते त्यानंतर सुशील कुमार यांनी जिंकलेले कुस्तीचे हे पदक होते. निश्चितच ही भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे.
सुशील कुमार यांचे प्रारंभिक जिवन
सुशील दिवान सिंह कुमार यांचा जन्म दक्षिण पश्चिमी दिल्ली येथील नजफगढ जिल्हयातील बापारोला गावात एका हिन्दू जाट परिवारात झाला. त्यांचे वडिल दिवान सिंह हे डिटीसी बस ड्रायवर होते त्याची आई कमला देवी हया एक गृहिणी आहेत. त्यांना कुस्तीची प्रेरणा त्यांचे ज्येष्ठ बंधु संदीप कुमार यांच्याकडून मिळाली.
वडीलांसोबत व आपल्या भावासोबत त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासुनच कुस्तीचा सराव सुरू केला होता. घरच्या जेवणासोबत पोषक आहार व दुध तूप आणि ताजी फळे व भाज्या त्यांनी घरच्याच खर्चावर करून २००८ च्या ऑलंपिक साठी भारतीय कुस्ती संघात स्थान मिळविले. कुस्ती खेळाकरता सोईचा अपुरेपणा त्यांनी त्यांच्या ध्येयापुढे येऊ दिला नाही.
२००८ च्या ऑलंपिक मध्ये कांस्य पदक जिंकलं. याआधी सुशील कुमार यांना फार कमी लोक ओळखायचे. पदक जिंकल्यानंतर संपुर्ण भारतात त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला गेला. तब्बल ५६ वर्षानंतर भारतास कुस्तीत ऑलंपिक पदक मिळाले होते. हा भारतीय कुस्तीच्या विकासाचा एक मोठा टप्पा मानला जातो.
सुशील कुमार यांचे करियर
सुशील कुमार यांचे करिअर वयाच्या १४ व्या वर्षापासुन सुरू झाले होते. त्यांनी नजफगढ छात्रसाल कुस्ती स्टेडियम मध्ये कुस्तीचा सरावा सुरू केला. त्यांच्या प्रतिभेस ओळखुन अर्जुन अवार्डने सन्मानित सतपालसिंह यांनी त्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले.
भारतीय रेल्वे संघाकडून त्यांना ज्ञानसिंह आणि राजकुमार बैसला गुर्जर यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. १९९८ मध्ये World Cadet Games मध्ये त्यांनी प्रथमतः कुस्तीत सुवर्ण पदक जिंकले होते.
२००० च्या वयाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली त्यानंतर २००३ मध्ये आशियाईकुस्ती चॅंपियनशिप मध्ये कास्य व Commonwealth खेळात त्यांनी गोल्ड मेडल् मिळविले.
२००४ च्या जागतीककुस्ती स्पर्धेत ते चौथ्या क्रमांकावर होते. २००४ च्या ऑलंपिक खेळात ते ६० किलो गटात ८ व्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावे लागले.
परंतु सुशीलला आपले बेस्ट दयायचे होते. २००८ च्या उन्हाळी ऑलंपिक मध्ये ब्रॉंझ पदक जिंकून त्यांनी इतिहास घडवला. त्यांची ही कामगिरी २०१२ च्या ऑलंपिक खेळात कायम राखुन त्यांनी सिल्वर पदक जिंकले.
२००६ मध्ये अर्जुन पुरस्कार व २०११ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानित केले गेले. आज सुशील युवा कुस्तीपटूंचे हिरो बनले आहेत.
सुशील कुमार यांचे यश
१) अर्जुन पुरस्कार २००५
२) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१०
३) पद्मश्री पुरस्कार २०११
४) २००८ च्या बिजींग ऑलंपिक मध्ये पदक जिंकल्याबद्दल,दिल्ली सरकार ५ कोटी रूपये ‘हरियाणा सरकारव्दारा २.५ कोटी रूपये’,’स्टील मिनिस्ट्री ऑफ इंडिया यांच्याकडून २.५ कोटी रूपये’,’आर.के ग्लोबल गृप व्दारा ५ लाख रूपये’,’महाराष्ट्र सरकारव्दारा १ कोटी रूपये’,’डज्छस् यांच्याकडुन १ कोटी रूपये’.’२०१० च्या जागतिक कूस्ती चॅंपियनशिप मध्ये गोल्ड जिंकल्याबद्दल ,भारतीय रेल्वे कडुन १ कोटी रूपये व सोबतच असिस्टंट कमर्शियल मॅनेजर पद बहाल’,’स्पोर्ट ऑथरीटी ऑफ इंडिया कडून १ कोटी रूपये ’,’दिल्ली सरकारतर्फे १ कोटी रूपये’.
५) २०१२ साली लंडन ऑलंपिक मध्ये सिल्वर पदक जिंकण्यासाठी’ दिल्ली सरकार कडून २ कोटी रूपये बक्षिस ‘हरियाणा सरकार कडून २.५० कोटी रूपये बक्षिस, भारतीय रेल्वे कडुन १.७० कोटी रूपये बक्षिस, हरियाणा सरकार कडुन कुस्ती अॅकॅडमी साठी सोनीपथ येथे १० एकर जमिन’.
सुशील कुमार भारतीय कुस्तीचे उगवते सुर्य मानल्या जातात. त्याच्या इतका पराक्रम अजुनही कोणत्या भारतीय पुरूष पहेलवानास शक्य झाला नाही. अशा महान भारतीयांमुळेच जगात भारताचे नाव उंचावल्या जाते.
तर आजचा लेख होता कुस्तीपटू सुशील कुमार यांच्याविषयी आपल्याला हि माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद!
(खासाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त पहिला राज्य क्रीडा दिन दिनांक १५ जानेवारी २०२२ पासून प्रत्येक आठवड्याला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंची माहितीची सृंखला शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत आपल्यासाठी सुरू केली आहे. आपणास ही संकल्पना कशी वाटली या बद्दल जरुर प्रतिक्रिया द्यावी.)
No comments:
Post a Comment
Thanks you