*मिरज कन्या'त शारीरिक शिक्षण दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यान*
मिरज: सद्यकालीन परिस्थितीत खेळाडूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून शारीरिक तंदुरुस्तीचे अनेक प्रश्न उभे राहिले आहे. खेळाडूंनी आपले वजन, आहार संतुलित ठेवण्यासोबतच शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. पद्मसिंह पाटील शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मिरजचे प्रा. सुधीर वाटवे यांनी केले. शारीरिक शिक्षण दिनानिमित्त मिरजेतील कन्या महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या "शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व" या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी होत्या. या व्याख्यानात कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थिनी ऑनलाईन पद्धतीने मोठया स्वरूपात सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थिनींनी संकलित केलेल्या भित्तीपत्रकेचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते झाले.
प्रा. सुधीर वाटवे यांनी आपल्या मार्गदर्शनातून शरीर मुद्रा, लठ्ठपणा, खेळासाठी आवश्यक मूलभूत कारक कौशल्ये, स्नायविक विकासासाठी उपयुक्त प्रशिक्षण, लवचिकतेसाठी आवश्यक आसने, दमदारपणा, प्रतिकार प्रशिक्षण, आहार, विश्रांती, झोप अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला. स्वागत व प्रास्ताविक वरिष्ठ विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक व कार्यक्रमाचे संयोजक प्रा. बाबासाहेब सरगर यांनी केले. कनिष्ठ विभागाच्या शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. सौ. मृदुला कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. प्रा. विनायक वनमोरे यांनी आभार मानले. प्रा. विश्वनाथ व्हनमोरे यांनी तांत्रिक सहकार्य केले.
Program Banner
No comments:
Post a Comment
Thanks you