Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Sunday, August 29, 2021

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय करा

 आजचा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पाहा. रक्त वाढवणारा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त चार वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे आवळ्याचा रस.

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय करा. मित्रांनो एकेकाळी गरीब आणि कुपोषित व्यक्तींचा आजार समजला जाणारा हा अनेमिया आजकाल कुणालाही दिसून येत आहे. विशेष करून महिलांना व बालकांना अनेमिया असण्याचे प्रमाण तुलनेत जास्त असते.

थकवा, अशक्तपणा, दम लागणे, बालकांचे वजन न वाढणे, वजन वेगाने कमी होणे, चक्कर येणे, हातापायांच्या नखांवर पांढरे चट्टे दिसून येणे अशी काही रक्ताच्या कमतरतेची लक्षणे दिसताक्षणी 

बाजारातून ताजे आवळे आणून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. आयुर्वेदिक औषधी दुकानात आवळा ज्युस देखील मिळतो. तो देखील तुम्ही वापरू शकता. आवळ्याला आयुर्वेदातील रसायन म्हटले जाते. कारण आवळाच्या सेवनाने शरीरातील सक्त धातूंचे पोषण होते. आपण आपल्या उपायासाठी तीन चमचे आवळ्याचा रस घ्यायचा आहे.

यानंतरचा दुसरा घटक म्हणजे बिट. रक्तवाढीसाठी बिटाचा वापर सर्वपरिचित आहे. बाजारातुन ताजे बिट आणून ते ठेचून त्यामधील रस वेगळा करायचा आहे. या रसामधील तीन चमचे रस घ्यायचा आहे. तिसरा घटक म्हणजे पालकांचा रस. पालकाच्या भाजीमध्ये आयर्न आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण मुभलक असल्याने रक्तवाढीसाठी पालक ही अत्यंत उपयुक्त भाजी आहे. पालकाच्या पानांचा रस देखील तीन चमचे एवढा घ्यायचा आहे.

यानंतर चौथा घटक म्हणजे खडीसाखरेची पावडर. दुकानात मोठ्या किंवा ओबड धोबड आकाराची खडीसाखर मिळते. रक्ताची कमतरता, मागे सांगितलेले घटक पूर्ण करतातच, पण थकवा, अशक्तपणा वेगाने रिकव्हर करण्यासाठी खडीसाखर मदत करते. आपण आपल्या आवडीनुसार खडीसाखरेची पावडर घ्यायची आहे. आता हे सर्व घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत.

मित्रांनो रक्तवाढीचा हा उपाय वापरताना चहा, कॉफी, सिगारेट, तंबाखू, मद्यपान करू नये. आहारात कोबी, फ्लावर, लोणचे किंवा अतिखारट अन्नपदार्थ काही दिवस वर्ज करावेत. सर्व घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार होईल. दिवसातून दोन किंवा तीन वेळा आणि सलग पाच ते सात दिवस हा ज्युस तुम्हाला प्यावा लागेल.

कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. धन्यवाद

1 comment:

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...