Activity Report
कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चित्तथरारक प्रात्यक्षीकांचे सादरीकरण
मिरज: दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय जिम्नॅस्टिक मार्गदर्शक श्री. दीपक सावंत व राष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू कु. काजल काळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राजू झाडबुके होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर क्रीडा विभागाने लावलेल्या सुकन्या भित्तीपत्रकाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. शरीर आणि मन निरोगी असेल तरच आपला देश निरोगी राहणार आहे याहेतूने फिट इंडिया मोव्हमेंट देशात सुरू करण्यात आली आहे. शरीर व मनाला तंदुरुस्त ठेवण्याचा संकल्प करणारी शपथ यावेळी सर्वाना देण्यात आली. महाविद्यालयाची खेळाडू कु. आदिती चौगुले हिने सर्वाना शपथ दिली.
महाविद्यालयीन विद्यार्थिनीमध्ये खेळाबाबत जाणीव व जागृती व्हावी. खेळाचे महत्व कळावे. या उद्देशाने क्रीडा विभाग प्रतिवर्षी क्रीडा दिन उत्साहात साजरा करतो. क्रीडा दिनाच्या निमित्ताने कु. काजल काळे यांच्या नेतृत्वाखाली भानू तालीम संस्थेच्या राज्य जिम्नॅस्टिक, मल्लखांब, अक्रोबेटिक्सच्या कु. सृष्टी सावंत, जान्हवी हारगे, प्रगती वाटवे, अदिती हारगे, अनुष्का घोडके, वरद बसरगे, आर्यन हारगे, सोहम जाधव, प्रथमेश देवबा, यश देसाई व सुरज हारगे या 11 खेळाडूंनी चित्तथरारक अशी जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिके सादर केली. या सर्व खेळाडूंचा व महाविद्यालयाच्या हँडबॉल खेळाडू कु. अदिती चौगुले, धनश्री नाईक व नेहा कोरवी यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात झाडबुके सरांनी, शरीर व मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन करून सर्वाना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. बाबासाहेब सरगर, कनिष्ठ विभागाच्या शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. सौ. मृदुला कुलकर्णी यांनी केले. आभार क्रीडा विभागाचे सदस्य प्रा. एम. जी. पाटील यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश कट्टीमणी यांनी केले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या प्रा. सौ. मंजिरी सहत्रबुद्धे, पर्यवेक्षिका डॉ. सुनीता माळी, क्रीडा विभागाचे सदस्य प्रा. विनायक वनमोरे, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयाच्या खेळाडू व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment
Thanks you