एक हात मदतीचा
निसर्गापुढे माणूस किती हतबल आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कऱ्हाड,सातारा,सांगली, कोल्हापूर भागात जलप्रलयाने अक्षरशः थैमान घातलं आहे. हजारो संसार आज उघड्यावर पडले आहेत. डोळ्यासमोर संसार वाहून जाताना हतबल झालेला माणूस डोळ्यात पाणी आणण्याशिवाय काहीही करू शकत नाही. निसर्गाच्या महाप्रलयापेक्षा त्यांच्या डोळ्यातला महाप्रलय काळजाला हात घालतोय.
लाखो लोकांवर निसर्गाचं हे महासंकट कोसळलं असताना आपण नुसतं ते पाहून अथवा हळहळ व्यक्त करून चालणार नाही. अशा उघड्या पडलेल्या संसाराला आपलाही थोडा हातभर लावला पाहिजे.
चला तर मग...
आपणही मदतीचा हात पुढं करू..
अश्रू भरल्या डोळ्यांना थोडा आशेचा किरण दाखवू..
कन्या महाविद्यालय,परिवार अशा कामांसाठी नेहमीच पुढे असतो. म्हणूनच आज आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून गुरुवार,दि.२२ ऑगस्ट,२०१९ रोजी बामणी, तालुका-मिरज,जिल्हा-सांगली याठिकाणी एन.एस.एस.(वरिष्ठ व कनिष्ठ विभाग),एन.सी.सी.व क्रीडा विभाग तसेच सर्व प्राध्यापक वर्ग,प्रशासकीय कर्मचारी व सर्व विद्यार्थिनी मिळून स्वच्छता मोहीम राबवून आपली नैतिक जबाबदारी पूर्ण केली.
*बामणी, ता.मिरज,जि. सांगली* या पूरग्रस्त बाधित गावात आज आमच्या कन्या महाविद्यालय मिरज मधील एन.एस.एस.विभाग ( वरिष्ठ व कनिष्ठ ),एन.सी.सी. विभाग व क्रीडा विभाग तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग,कर्मचारी वर्ग यांचेवतीने स्वच्छता शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरास विशेषकरून प्रा.डॉ.सागर लटके-पाटील यांच्या कोळे ता.कराड,जि. सातारा या गावातून त्यांच्या मित्रांनी पूरग्रस्त लोकांना आलेली कौटुंबिक साहित्याची मदत व त्या साहित्याचे वाटप बामणी गावातील लोकांना करण्यात आले... स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर त्या गावातील लोकांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती...आमचे गाव अजुन महिनाभर स्वच्छ झाले असते का माहीत नव्हते पण तुमच्या विद्यार्थिनींनी केलेली आजची मदत आम्ही कधीच विसरू शकत नाही.. आमचे प्राचार्य राजू झाडबुके, पर्यवेक्षिका डॉ.सुनीता माळी मॅडम व संपूर्ण गावाला पुरेल एवढे साहित्य घेऊन येणारे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ.सागर लटके-पाटील, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.बाबासाहेब सरगर, एन.सी.सी. विभाग प्रमुख प्रा.सौ.नलिनी प्रज्ञासुर्य यांचे अनमोल सहकार्य मिळाले. आपल्या सर्वांच्या सोबतीने 'मदतीचा हात' या संकल्पनेला मूर्तरूप मिळाले...या अस्मानी संकटात आपल्या पूरग्रस्त बांधवाना उभारी देण्यासाठी ज्ञात-अज्ञात अशी अनेक संवेदनशील मने धावून आली... हा अनुभव 'माणूस' म्हणून व्यक्तिशः आम्हाला समृद्ध करणारा आहे..!!
कन्या महाविद्यालय, मिरज परिवार
.
अतिशय सुंदर उपक्रम
ReplyDeleteअतिशय सुंदर उपक्रम
ReplyDelete