Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Thursday, February 21, 2019

कॉमर्स/आर्टसच्या तरुणांसाठी खास असलेल्या अज्ञात करिअरच्या संधी

http://inmarathi.com/

'करियर'...........! 
तमाम आई वडिलांच्या जीवाला घोर लावणारा विषय. पाल्य इयत्ता १० ला पोचल्यावर घरोघरी ह्याच विषयावर चर्चा झडतात. सायन्स घेऊन डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट बनायला सगळ्यांची धाव असते.पण दहावीला मिळालेल्या मार्कंचं आणि कॉलेजला लागणाऱ्या प्रवेशासाठीच्या लिस्ट चे गणित जुळले नाही तर मात्र हिरमुसणारे असंख्य आहेत.
 "सायन्स ला तिसऱ्या यादीची वाट पाहून सुद्धा प्रवेश न मिळाल्यावर नाईलाजाने कॉमर्सकडे वळणारे खूप जणं आहेत. आवडीने आर्ट्स कडे जाणारे विद्यार्थी तर अगदीच बोटावर मोजण्याइतके मिळतील. "
 कमी मार्कात असणाऱ्याला टेक्निकल डिप्लोमा, किंवा इतर कोर्स करण्याची आवड नसल्यास आर्ट्स कडे जावे लागते.

पण कॉमर्स आणि आर्ट्स करून पुढे जाऊन काय बनायचं? नोकरी धंदा मिळावा म्हणून नुसत्या आर्ट्स च्या पदवी वर भागेल का? कॉमर्स नंतर सीए व्यतिरिक्त काय बनता येईल ह्या संदर्भात मार्गदर्शन मिळाल्यास बेकार व्यक्तींची संख्या नक्कीच कमी होईल.
"डॉक्टर इंजीनियर बनून खोऱ्याने पैसे नाही कमावता आला म्हणून काय झाले. इतर अनेक करियर क्षेत्रे आहेत जिथे आपण यशस्वी होऊ शकतो. "
 पाहुयात काही विकल्प ज्यामध्ये आर्ट्स कॉमर्स करूनही आपण आपला भवितव्य घडवू शकतो.

कॉमर्स नंतर उपलब्ध असलेल्या संधी :

बारावी नंतर विद्यार्थी B.Com ची पदवी आणि त्यानंतर M.Com पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात. हे करावयाचे नसल्यास बारावी नंतरही काही कोर्स करता येतात. जसे-


  • फायनान्स
  • बँकिंग
  • चार्टर्ड अकाऊंटेंसी
  • कंपनी सेक्रेटरी
  • इन्शुरन्स
  • इकॉनॉमिक्स
  • फॉरेन ट्रेड
  • स्टॉक ब्रोकिंग आणि इन्वेसमेंट्स

कॉमर्स संबंधित नोकऱ्यांशी आधारित संधी :

काही वर्षांपर्यंत कॉमर्स केल्यावर नोकऱ्यांची दोनच पर्याय उपलब्ध होते. एक बीकॉम बरोबर अकाऊंट्स आणि दुसरा बीकॉम बरोबर मॅनेजमेंट पण आताच्या घडीला भरपूर पैसे मिळवून देतील असे काही दुसरे पर्याय उपलब्ध आहेत.
"विद्यार्थी कॉमर्स सोबत अकाउंटनसी अँड फायनान्स पदवीधर, बँकिंग अँड इन्शुरन्स पदवीधर आणि  फायनॅॅन्शियल मार्केटिंग पदवीधर असे आणखी काही पर्याय निवडू शकतो. "
 कॉमर्स नंतर ट्रॅव्हल आणि टुरिझमचा डिप्लोमा हे ही एक चांगले ऑप्शन आहे. वरील सगळ्या प्रकारच्या शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना ३ लाखां पासून ते ९ लाखांपर्यंत चे वार्षिक पॅकेज मिळू शकते.

कॉमर्स मधील MA पदवी :

कॉमर्स नंतर MA चा अभ्यास करून पुढे आणखीन करियर चे पर्याय खुले होतात.

MA केल्यास तुम्हाला खालील काही विषयांचे शिक्षक ही बाण्याचे क्षेत्र प्राप्त होते जसे सिविल सर्व्हिस च्या परीक्षा बँकिंग परीक्षा ब्रोकिंग शिकवणे फायनान्स क्षेत्रातील शिक्षक इकॉनॉमिक्स चे शिक्षक आणि अजून बऱ्याच संधी..

कॉमर्स मधील इतर काही महत्वाच्या संधी :


  •  अकाऊंटंट
  • अकाऊंटंट एक्झेक्युटिव्ही
  • चार्टर्ड अकाऊंटंट
  • कंपनी सेक्रेटरी
  • कॉस्ट अकाऊंटंट
  • फायनान्स अनालिस्ट
  • फायनान्स प्लॅनर
  • फायनान्स मॅनेजर
  • फायनान्स कंट्रोलर
  • फायनान्स कन्सल्टंट
  • इन्व्हेस्टमेंट अनालिस्ट
  • स्टॉक ब्रोकर
  • पोर्टफोलिओ मॅनेजर
  • टॅक्स ऑडिटर
  • टॅक्स कन्सल्टंट
  • ऑडिटर
  • स्टॅटिस्टिशिअन
  • इकॉनॉमिस्ट

कॉमर्स मध्ये नोकऱ्यांच्या संधी देणाऱ्या संस्था :

कॉमर्स चे पदवीधर असून आणि वरीलपैकी कोणत्याही परिक्षांत उत्तीर्ण झाल्यावर काही संस्था तुम्हाला नोकरीच्या उत्तम संधी देतील.

  • पब्लिक ऑर्गनिझेशन्स
  • मोठे बिझनेस सेक्टर
  • लहान बिझनेस सेक्टर
  • बँका
  • फायनान्स अँड लिझिंग
  • BPO
  • KPO
  • मल्टिनॅशनल कंपन्या
  • सॉफ्टवेअर कंपन्या
ह्या वरील सगळ्या संस्था तुम्हाला १५००० ते २०००० च्या पगारापासून जसजसा अनुभव वाढत जाईल तसतसा ६ ते ७ आकडी पगारही देऊ करतील.

आता बघुयात आर्टस् घेतलेल्यांना काय काय संधी उपलब्ध आहेत :

सायन्स आणि कॉमर्स घेतलेल्यांपेक्षा जास्ती संधी आर्ट्सच्या पदवीधरांना आहेत असे म्हटल्यास आपल्या भुवया नक्कीच उंचवतील. पण हे खरे आहे.
"लॉ, पत्रकारिता, फॅशन डिझायनिंग, कूकरी, अनिमेशन, एव्हीएशन, बँकिंग आणि अजून भरपूर क्षेत्रे ह्यांच्या साठी खुली आहेत. "

डिझायनिंग :
  • फॅशन डिझायनिंग
  • टेक्सटाईल डिझायनिंग
  • इंटेरिअर डिझायनिंग
अनिमेशन आणि मल्टिमीडिया :
  • ग्राफिक डिझाइन
  • वेब डिझाइन
  • अनिमेशन डिझाइन
लॉ आणि ह्यूमॅनिटीज :
  • लॉ
  • इकॉनॉमिक्स
  • सायकॉलॉजि
  • सोशिऑलॉजी
मॅनेजमेंट :
  • BBA
  • BMS
  • BBM
हॉस्पिटॅलिटी आणि एव्हीएशन :
  • हॉटेल मॅनेजमेंट
  • इव्हेंट मॅनेजमेंट
  • ट्रॅव्हल आणि टुरिझम
मीडिया :
  • जर्नालिझम
  • मास कम्युनिकेशन
  • मीडिया मॅनेजमेंट

वरील सगळे कोर्स आर्टस् च्या पदवी नंतर करता येतात. ह्या सगळ्या व्यतिरिक्त अजूनही काही आवडीनुसार करता येतील असे कोर्सेस आहेत. जसे


  • फोटोग्राफी
  • अभिनय प्रशिक्षण
  • मॉडेलिंग
  • एअर होस्टेस
  • फाईन आर्ट
  • लिटरेचर
  • पॉलिटिकल सायन्स
  • फॉरेन लँग्वेज
  • शिक्षक प्रशिक्षण
  • लॉ कोर्स
  • रिटेल आणि फॅशन मर्चनडाईझ

हे सगळे कोर्स करायला भरपूर स्पेशलाईझड कॉलेजेस आहेत. वेगवेगळे कोर्स वेगवेगळ्या कालावधीचे असून. काही कोर्स नंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील थाटू शकता.

त्यामुळे डॉक्टर इंजिनिअर बनता न येऊ शकल्याने खचून न जाता आपल्या आवडीनुसार दुसरे क्षेत्र निवडणे योग्यच..!

http://inmarathi.com/

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...