Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Wednesday, February 13, 2019

शरीरामध्ये अचानक होणाऱ्या बदलांचा असतो एक खास अर्थ ,जाणून घ्या असे बदल जे अचानक होतात ..

विद्वानांचे असे म्हणणे आहे की, देवाने या जगात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती बनवली असेल तर ती म्हणजे मानवाचे शरीर. त्याने मानवाचे शरीर रहस्यमयी बनवले आहे, ज्यावर आजही अनेक विद्वान विचारमंथन करतात. आपल्या शरीराचे सगळे भाग कोणत्या न कोणत्या भागांशी जोडलेले असतात. म्हणून तर जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा घाम फुटतो आणि डोळ्यात काही गेले तर पहिले पापण्या बंद होतात. यासारखे अनेक परिवर्तन मानवाच्या शरीरात होत असतात. पण त्यामागील सत्य न जाणता लोकं त्यापासून दुर्लक्षित राहतात.

मानवाच्या शरीरात होणाऱ्या परिवर्तनाचा आपला एक उद्देश असतो. :-

शरीरात अचानकपणे होणाऱ्या परिवर्तनाबद्दल आपण समजू नाही शकत पण मानवी शरीराबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आपण त्यावर लिहिलेली मोठमोठी पुस्तके वाचू शकता. नाही तर मग हा लेख वाचा, ज्यात आपल्या शरीरात होणाऱ्या परिवर्तनासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळून जातील. चला तर जाणून घेऊ असेच काही लक्षण.
त्वचेचे संकोचने :-
जास्त वेळ पाण्यात राहिल्यास हातपायाच्या बोटांची त्वचा संकोचते. जास्त वेळ राहिल्याने त्वचा निसटती व्हायला आणि पाण्यातील वस्तूवर पकड मजबूत राहायला संकोचते.

शहारे उठणे :-
जेव्हा गरजेपेक्षा जास्त थंडी वाजयला लागते तेव्हा मेंदू अधिक ऊब निर्माण करायला शहारे आणून संकेत देत असत.


पोटात गडबड :-
जेव्हा पण आपण कुण्या नव्या व्यक्तीला भेटतो तेव्हा पोटात गडबड होते जणू काही फुलपाखरे उडत आहेत. असे यामुळे होते कारण आपल्या पोटातील एड्रानिल हार्मोन निघत असतात.


जांभई देणे :-
जांभई देणे अशुभ मानलं जातं. पण जांभई कमी झोप झाल्यास आणि शरीराचे तापमान कमी करण्यासाठी येते.


शिंक येणे :-


सर्दी पडसे नसूनही शिंक येते. जेव्हा आपल्या श्वासासोबत धुळीचे कण शरीरात जात असतात तेव्हा त्यांना रोखण्यासाठी शिंक येत असते.


डोळ्यात अश्रू :-
 अश्रू सुखा दुःखाच्या रुपात बघितले जातात. पण खरतर अश्रू डोळ्यांची सफाई करत असतात.

घाम :-

जेव्हा आपल्या शरीराला उष्णता जाणवते तेव्हा घाम यायला लागतो. पण त्यामागील कारण असे की, जेव्हा शरीराचे तापमान गरजेपेक्षा जास्त वाढते तेव्हा ते कमी करायला घाम येतो.


उचकी लागणे :-


उचकी लागणे हे लोकांत सामान्य आहे. उचकी लागल्यावर लोक म्हणतात कुणीतरी आठवण काढत असेल. पण हे चुकीचे आहे. जेव्हा आपण काही चुकीच्या पद्धतीने किंवा घाईत खातो तेव्हा न्यूमोगैस्ट्रिक नर्ववर दबाव येतो ज्यामुळे उचकी लागते. अश्याच सुंदर माहितीसाठी आमुचे ब्लोग लाईक करायला विसरू नका .भविष्यात अशेच लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ ..

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity Baseball tournament 2024-25

  आर्ट्स कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला . या यशाच्य...