सुबोध योग प्रश्नमंजुषा २०२०
दि न्यू मिरज एजुकेशन सोसायटीचे कन्या महाविद्यालय, मिरज अंतर्गत 'सुबोध ऑनलाइन योग प्रश्नमंजुषा २०२०'
कै.सुबोध गोरे यांचे स्मरणार्थ मोबाईलवर सुबोध ऑनलाइन योग प्रश्नमंजुषा शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आयोजित करीत आहोत.
दि न्यू मिरज एजुकेशन सोसायटीचे कन्या महाविद्यालयाचे हितचिंतक , कायमच महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागास मदत करणारे सांगली जिल्ह्याचे राष्ट्रीय योगपटू व सांगली जिल्हा योग परिषद व श्री.अंबाबाई तालीम संस्था,मिरजचे सचिव कै. सुबोध गोरे यांच्या स्मरणार्थ ऑनलाइन योग प्रश्नमंजुषा शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आयोजित करीत आहोत.
कै. सुबोध गोरे यांच्या योगासाधनेतील प्रचंड मोठे योगदान कार्याचा प्रसार व प्रचार पुढे चालू ठेवण्याकरिता तसेच योगाचे ज्ञान वाढविणे यासाठी या योग प्रश्नमंजुषा आपण सहभाग नोंदवावा. ही ऑनलाइन प्रश्नमंजुषा सर्वांसाठी मोफत आहे. एक विरंगुळा एक आनंद, ज्ञान जागृत करणे यासाठी आपण या योग प्रश्नमंजुषा सहभाग घ्यावा ही विनंती.
सहभागी सर्वांना ई-प्रमाणपत्र दिले जाईल.
प्रेरणा:
श्री.सुधीर गोरे
कार्यवाह, दि न्यू मिरज एजुकेशन सोसायटी,मिरज
श्री. राजू झाडबुके
माजी प्राचार्य
संयोजक
प्रोफ.डॉ.शर्वरी कुलकर्णी
प्र.प्राचार्या
प्रा.मंजिरी सहत्रबुद्धे
उप-प्राचार्या
कनिष्ठ विभाग
डॉ. सुनीता माळी
पर्यवेक्षक
कनिष्ठ विभाग
प्रा. बाबासाहेब सरगर
शारीरिक शिक्षण संचालक
स्पर्धा निमंत्रक ९८२३०८७३७६
प्रा. मृदुला कुलकर्णी
शारीरिक शिक्षण संचालिका
स्पर्धा निमंत्रक
Competition Rules
दि न्यू मिरज एजुकेशन सोसायटीचे कन्या महाविद्यालय, मिरज अंतर्गत 'सुबोध ऑनलाइन योग प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२०'
कन्या महाविद्यालय, मिरजच्या आजी-माजी विद्यार्थिनी असणाऱ्या सर्व सुकन्यांसाठी कै.सुबोध गोरे यांचे स्मरणार्थ मोबाईलवर सुबोध ऑनलाइन योग प्रश्नमंजुषा स्पर्धा शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आयोजित करीत आहोत.
दि न्यू मिरज एजुकेशन सोसायटीचे कन्या महाविद्यालयाचे हितचिंतक , कायमच महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागास मदत करणारे सांगली जिल्ह्याचे राष्ट्रीय योगपटू व सांगली जिल्हा योग परिषद व श्री.अंबाबाई तालीम संस्था,मिरजचे सचिव कै. सुबोध गोरे यांच्या स्मरणार्थ ऑनलाइन योग प्रश्नमंजुषा स्पर्धा शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आयोजित करीत आहोत.
कै. सुबोध गोरे यांच्या योगासाधनेतील प्रचंड मोठे योगदान कार्याचा प्रसार व प्रचार पुढे चालू ठेवण्याकरिता तसेच योगाचे ज्ञान वाढविणे यासाठी या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवावा. या स्पर्धेत आपल्याला मिळालेले गुण हे आपल्या गुणवत्तेची ओळख नक्कीच असणार नाहीत कारण आपण सर्वजण आपापल्या क्षेत्रात पारंगत व तज्ञ असतोच. ही ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा सर्वांसाठी मोफत आहे. यासाठी असणारी बक्षीस रक्कम किती आहे यापेक्षा यातून मिळणारे ज्ञान व आनंद लाखमोलाचा आहे. एक विरंगुळा एक आनंद, ज्ञान जागृत करणे यासाठी आपण या स्पर्धेत सहभाग घ्यावा ही विनंती. सद्यस्थितीत कोवीड - १९ अर्थात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
बक्षिसे
प्रथम क्रमांक ५०१ रू
द्वितीय क्रमांक ४०१ रू
तृतीय क्रमांक ३०१ रू
चतुर्थ क्रमांक २०१ रू
पाचवा क्रमांक १०१ रू
सहभागी सर्वांना ई-प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच बक्षीस पात्र विद्यार्थिनींना रोख रक्कम व क्रमांकाचे ई-प्रमाणपत्र देणेत येईल.
या स्पर्धेसाठी कसलीही फी आकारली जाणार नाही. ही परीक्षा सर्वांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे.
परीक्षा दिनांक:- गुरुवार ९/०७/२०२०
वेळ:- सकाळी ११.०० ते १२.००
नियम व अटी:-
1.कन्या महाविद्यालय, मिरजच्या आजी-माजी विद्यार्थिनी असणाऱ्या सर्व सुकन्याच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
2.ही प्रश्नमंजुषा स्पर्धा केवळ मोबाईल अगर संगणकावर वर देता येईल.
3. स्पर्धेविषयी माहिती देणे, शंकासमाधान करणेसाठी तसेच स्पर्धेची लिंक देण्यासाठी व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करणेत आलेले आहेत. या ग्रुपमध्ये सामील असणाऱ्या स्पर्धकाला स्पर्धेची लिंक मिळेल.
4.स्पर्धा सुरू करण्यापूर्वी स्पर्धकाने आपले पूर्ण नाव इंग्रजीमध्ये (स्वतः चे नाव - वडिलांचे नाव - आडनाव ), महाविद्यालयाचे नाव इंग्रजी मध्ये, वर्ग, हजेरी क्र. तसेच व्हॉट्सॲप फोन क्रमांक लिहिणे अनिवार्य असेल. यामध्ये त्रुटी आढळणाऱ्या स्पर्धकाचा बक्षीसासाठी विचार करणेत येणार नाही.
5.स्पर्धा नियोजित वेळेनुसार सकाळी ११.०० वाजता सुरू होईल व स्पर्धकाने १२.०० वा. पूर्वी परीक्षा सबमिट म्हणजे जमा करायचे आहे. त्यानंतर एका सेकंदाने ही उशिरा जमा होणाऱ्या उत्तरपत्रिकांचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही. वैयक्तिक माहिती लिहिण्यासाठी जादा वेळ दिला जाणार नाही.
6. आपल्या मोबाईलवर लिंक उघडताना येणाऱ्या अडचणी,मोबाईल डाटा संदर्भातील अडचणी अगोदरच दूर करून घ्याव्यात. त्यासाठी संयोजक जबाबदार असणार नाहीत.
7. सरावासाठी २० प्रश्न व ४० गुणांची कोरोना रोगावर आधारित एक नमुना परीक्षा आपल्याला मंगळवार दिनांक ०७/०७/२०२० सायंकाळी ७ पर्यंत दिली जाईल. त्याचा पुढील दोन दिवसात केंव्हाही सराव केल्यास मुख्य परीक्षेवेळी अडचणी येणार नाहीत.
8.स्पर्धा ही ऑनलाईन असलेने आपण कोणत्याही ठिकाणाहून ही परीक्षा देऊ शकता.
9.या ऑनलाईन स्पर्धेमध्ये 'योग व आरोग्य' यावर आधारित १०० गुणांचे ५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
10. एका मोबाईलवर केवळ एकच परीक्षा देता येईल.
विजेत्या स्पर्धकांचे क्रमांक ठरविताना.....
1.निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करून सर्वाधिक गुण मिळविलेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांक दिला जाईल.याप्रमाणे पुढील सर्व क्रमांक दिले जातील.
2.समान गुण मिळविलेल्या स्पर्धकांमध्ये ज्या स्पर्धकाने अगोदर परीक्षा पूर्ण केली आहे त्याला अगोदरचा क्रमांक दिला जाईल.(आपली परीक्षा किती वाजून किती मिनिटांनी व किती सेकंदाने जमा झाली याची नोंद आमच्याकडे (2020/05/29 8:08:57 ) अशा प्रकारे होणार आहे )
3. आपल्याला मिळालेले गुण, चुकलेले प्रश्न व त्यांची अचूक उत्तरे सबमिट म्हणजे जमा केलेवर १२.०० वा.नंतर मिळतील.तसेच सहभाग ई-प्रमाणपत्र ई-मेल वर लगेच मिळतील.
शक्य असल्यास सोशल डिस्टन्सिंग नियमांचा अवलंब करून फक्त पहिल्या पाच क्रमांकाना प्रत्यक्ष बक्षीस वितरण केले जाईल. सर्व प्रमाणपत्रे आपण दिलेल्या ई-मेल द्वारे पाठवली जातील. त्यामुळे आपला ई-मेल आय-डी योग्य पद्धतीने नोंदवावा.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी खालील योग्य त्या एका लिंकवर क्लिक करून व्हाटसअँप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. ग्रुपचे सेटिंग only admin असे असणार आहे. आपल्याला असलेल्या शंका आपण वैयक्तिक विचारायच्या आहेत. एका विद्यार्थिनीने केवळ एकाच ग्रुपमध्ये सामील व्हायचे आहे.ग्रुपमध्ये असणाऱ्या कोणत्याही अनोळखी विद्यार्थिनीला संदेश करणे किंवा इतर गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थिनीला तात्काळ रिमुव्ह केले जाईल.
https://chat.whatsapp.com/JJGj8tGomis7bIftHcmAgO
https://chat.whatsapp.com/H2IjHJbmmrkHSAXos3COjV
प्रेरणा:
श्री.सुधीर गोरे
कार्यवाह, दि न्यू मिरज एजुकेशन सोसायटी,मिरज
श्री. राजू झाडबुके
माजी प्राचार्य
संयोजक
प्रोफ.डॉ.शर्वरी कुलकर्णी
प्र.प्राचार्या
स्पर्धा अध्यक्ष
प्रा.मंजिरी सहत्रबुद्धे
उप-प्राचार्या
कनिष्ठ विभाग
डॉ. सुनीता माळी
पर्यवेक्षक
कनिष्ठ विभाग
प्रा. बाबासाहेब सरगर
शारीरिक शिक्षण संचालक
स्पर्धा निमंत्रक ९८२३०८७३७६
प्रा. मृदुला कुलकर्णी
शारीरिक शिक्षण संचालिका
स्पर्धा निमंत्रक
Certificate Sample
Participant List
No comments:
Post a Comment
Thanks you