योगासने
- प्रस्तावना
- योगासनांचे 6 गट
प्रस्तावना
स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे 'योगासन' अशी व्याख्या आहे. आपल्याला माहीत असणारी अनेक योगासने 'अवघड' वाटतात. सुरुवातीस योगासने करणे जड जाते. हळूहळू सरावाने आणि शरीर लवचीक झाल्याने ही अवघड दिसणारी आसने 'स्थिर' व 'तणावमुक्त' (सुखाची) होऊ लागतात. असे आदर्श आसन करणे एकदम साधत नाही. काही जणांना काही आसने साधतात, तर इतरांना इतर आसने साधतात. वय व शरीरबांधणीनुसार यात फरक पडतो. लहानपणी शिकल्यास योगासने लवकर येतात. म्हणूनच शाळेपासून योगविद्या शिकवणे आवश्यक आहे.
योगासनांचे 6 गट
- उभी आसने
- बैठी आसने
- पाठीवर झोपून करायची आसने
- पोटावर झोपून करायची आसने
- खाली डोके वर पाय अशी अवस्था
- पोटाची आसने/क्रिया
या 6 गटांत मिळून शेकडो आसने येतात. मात्र त्यातली निवडक आसने प्रचलित आहेत. सर्व आसने करणे एखाद्यालाच शक्य होते. ही सर्व आसने शरीर सर्वांगाने लवचीक व सुदृढ व्हावे म्हणून उपयोगी आहेत. प्राचीन काळात अनेक योगी (हठयोगी) पुरुषांनी अनेकविध आसने शोधली.
नाशिकच्या कुंभमेळयातले फोटो किंवा टी.व्ही दृश्ये आपण पाहिली असतील. देशातले शेकडो-हजारो साधू-बैरागी कुंभमेळयास जमतात. तासन् तास योगासने करण्याची त्यांची शक्ती व साधना अचंबित करते. एका पायावर उभे राहणे (एकपादासन), शीर्षासन (खाली डोके वर पाय), पद्मासन (बैठक) आदि आसने लीलया ते तासन् तास ठेवू शकतात. असा हठयोग सामान्य माणसाला साधणे अवघड आहे. सामान्य व्यक्तीकडून तशी अपेक्षाही नसते. आरोग्यासाठी योग एवढेच आपले इथे उद्दिष्ट आहे.
वरील सहा गटांतील विविध आसने आपल्याला योगशिक्षकाकडूनच शिकावी लागतील. आपल्या कुवतीनुसार योग्य ती आसने आणि क्रम शिकायचे असतात. तक्त्यात योगासनांची गटवारी दिली आहे. ही वर्गवारी केवळ माहीतीसाठी आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
योग
- योगाची व्याख्या
- योग एक सार्वभौमिक व्यावहारिक अनुशासन
- विकासवादी प्रक्रियेच्या रुपात योग
- योग एक आत्म चिकित्सा
- योगाचे प्रकार
- जप योग
- कर्म योग
- ज्ञान योग
- भक्ति योग
- राज योग
- कुंडलिनी
- नाडी
- भारतात योगासाठीच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था
- मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था, नवी दिल्ली
योगाची व्याख्या
संतुलित पद्धतीने निहीत शक्ती सुधारणे किंवा विकसित करण्यासाठी योग हे एक अनुशासन आहे. योग आत्म प्रचीती प्राप्त करण्यास अर्थ प्रदान करते. योग शब्दाचा शाब्दिक अर्थ संस्कृत मध्ये ‘योक’ असा आहे. म्हणूनच योगाची व्याख्या ही देवाच्या सार्वभौमिक भावनेबरोबर व्यक्तिगत भावना एकत्रीत करणे अशी करता येते. महर्षी पतंजली यांच्या मते, मनाच्या बदलांवरील प्रभाव कमी करण्याची पद्धत म्हणजे योग.
योग एक सार्वभौमिक व्यावहारिक अनुशासन
योगाभ्यास हा सार्वभौमिक आहे आणि त्याचा प्रयोग संस्कृति, राष्ट्रीयता, जाति, लिंग,पंथ, आयु आणि शारीरिक अवस्था पहात नाही. ग्रंथांचे वाचन करण्याने किंवा एखाद्या तपस्व्याची आड घेउन, एक निपुण योगी बनता येत नाही. अभ्यासा शिवाय कोणीही यौगिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाचा तसेच अपल्यातल्या निहित क्षमतेचा अनुभव घेउ शकत नाही. केवळ नियमित अभ्यास (साधना) शरीर आणि मन सुधारण्याची पद्धत निर्माण करतात. त्यासाठी चेतनेच्या उच्च स्तराचा अनुभव घेण्यासाठी योगाभ्यासकाच्या सखोल इच्छेची आणि मन प्रशिक्षण आणि सकल चेतनेच्या परिष्कृततेच्या माध्यमाची गरज असते.
विकासवादी प्रक्रियेच्या रुपात योग
मानवीय चेतनेच्या विकासासाठी योग हे विकासवादी प्रक्रियेचे रुप आहे. संपूर्ण चेतनेचा विकास कोण्या विशेष व्यक्तीतून सुरु होणे आवश्यक नाही पण संपूर्ण चेतनेचा विकास तेव्हाच सुरु होतो जेव्हा तो ते सुरु होण्याचे ठरवितो. दारु आणि नशील्या पदार्थांचे सेवन, थकेपर्यंत काम करणे, लैंगिक बाबींमध्ये जास्त प्रमाणात गुंतणे आणि उत्तेजनेची इतर काही साधने शोधणे, बेशुद्धीत असणे. पश्चिमी मनोविज्ञानाचा जेथे अंत होतो त्या स्थानापासून भारतीय योगाचा प्रारंभ होतो. जर फ्रॉइडचे मनोविज्ञान रोगाचे मनोविज्ञान असेल आणि मॅसलोचे मनोविज्ञान निरोगी व्यक्तीचे मनोविज्ञान असेल तर भारतीय मनोविज्ञान आत्मज्ञानाचे मनोविज्ञान आहे. योगामध्ये प्रश्न मनुष्याच्या मनोविज्ञानाचा नसून उच्च चेतनेचा आहे. मानसिक स्वास्थ्याचा देखील येथे प्रश्न नसून, अध्यात्मिक विकासाचा प्रश्न आहे.
योग एक आत्म चिकित्सा
योगाच्या सर्व मार्गांमध्ये (जप, कर्म, भक्ती इ.) दुःखाचा प्रभाव कमी करुन त्यावर उपचार करण्याची क्षमता आहे. परंतु, त्यासाठी विशेष रुपाने एखाद्या निपुण प्रतिपादकाकडून उचित मार्गदर्शनाची गरज पडते - जो अगोदरच या मार्गाने गेलेला आहे आणि त्याने अंतिम लक्ष्य गाठलेले आहे. आपली योग्यता लक्षात ठेउन सक्षम सल्लागाराकडून किंवा निपुण योग्याच्या सल्ल्याने एखादा विशेष मार्ग अति सावधगिरीने अवलंबिणे गरजेचे आहे.
योगाचे प्रकार
जप योग
परमात्म्याचे नामस्मरण किंवा एखादे पवित्र अक्षर, मंत्र इ जसे ‘ओम्’, ‘राम’, ‘अल्ला’, ‘देवा’, ‘वाहे गुरु’ इ. चा सस्वर पाठ करुन किंवा सलग स्मरण करुन मन एकाग्र करणे.
कर्म योग
फळाची चिंता न करता सर्व कामे कशी करावी हे शिकवते. या साधनेत योगी आपल्या कामाला दैवी क्रिया समजतो, संपूर्ण मनः समर्पणाने ते करतो पण सर्व इच्छांना दूर ठेवतो.
ज्ञान योग
आत्म आणि इतर यामधील फरक शिकविते आणि शास्त्राच्या अध्ययनाच्या माध्यमातून, संत संगतीने आणि ध्यान प्रथांनी एखाद्याच्या अध्यात्मिक संस्थेचे ज्ञान घेण्यास मदत करते.
भक्ति योग
भक्ति योग, तीव्र भक्ति प्रणाली म्हणजे परमात्म्यासमोर संपूर्ण समर्पणावर भर देणे. भक्ति योगाचा खरा अनुयायी अहंभावा पासून मुक्त, विनम्र राहतो आणि विश्वाच्या द्वंद्वाबाबत निर्विकार असतो.
राज योग
राज योगाला लोकप्रिय नाव आहे “अष्टांग योग”. हा मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा समावेश असतो.
कुंडलिनी
कुंडलिनी योग तांत्रिक परंपरेचा भाग आहे. सृष्टीच्या उदयानंतर, तांत्रिक आणि योग्यांनी हे ताडले होते की या भौतिक शरीरात ‘सात’ चक्रातील पहिल्या मुळाधार चक्रात संभावित बल वसलेले आहे. कुंडलिनी ही पाठीच्या कण्याच्या टोकाशी असलेली एक छोटीशी ग्रंथी आहे. पुरुषाच्या शरीरात ही ग्रंथी मल आणि मुत्र विसर्जक अवयवांच्या मध्यभागी असते. स्त्रीच्या शरीरात ही गर्भाशयाच्या मुळाशी आसते. ज्या व्यक्ति ही ग्रंथी जागृत करतात त्यांना ऋषी, प्रेषित, योगी, साधू असे म्हणतात किंवा परंपरा आणि संस्कृति प्रमाणे इतर काही नावाने संबोधतात. कुंडलिनी जागृत करण्यासाठी आपल्याला स्वतःला शतक्रिया, आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि ध्यान या योगिक तंत्रांत पारंगत करावे लागते. कुंडलिनी जागृत करण्याने मेंदूत स्फोट झाल्याप्रमाणे त्याचे निष्क्रिय भाग काम करु लागतात आणि सुप्त भाग फुलांसारखे बहरु लागतात.
नाडी
यौगिक ग्रंथांद्वारे वर्णित, नाडी हा उर्जेचा प्रवाह आहे ज्याची कल्पना आपण मानसिक स्तरावर प्रकाश, रंग, ध्वनि आणि अन्य विशेषतांच्या स्वरुपाने करु शकतो. नाडीचे संपूर्ण जंजाळ हे एवढे विशाल आहे की यौगिक ग्रंथांमध्ये देखील त्याचे ठोस मोजमाप वेगवेगळे आहे. गोरक्ष सातक आणि संहितेतील संदर्भ आणि हठयोग प्रदिपीका यात त्यांची संख्या 72,000 दिली आहे; नाभीच्या केंद्रातून त्याचा उगम – मनीपुर चक्रात सांगीतला आहे. हजारो नाड्यांमध्ये सुषुम्न ही सर्वात मुख्य म्हटली जाते. शिव स्वरोदयामधून दहा मुख्य नाड्या उगम पावतात ज्यांद्वारे ‘दारे’ जोडलेली असतात व ही दारे शरीराच्या आत आणि बाहेर उघडतात. या दहामधून, इदा, पिंगला आणि सुषुम्न या फार महत्वाच्या आहेत. त्या उच्च तणाव वाहणा-या तारा असून त्या पाठीच्या कण्याच्या उप-स्थानावर उर्जा किंवा चक्रांचे आचरण करतात.
भारतात योगासाठीच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था
मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था, नवी दिल्ली
- मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था (एमडीएनआयवाय) एक स्वायत्त संस्था आहे जी सोसायटी नोंदणीकरण अधिनियमांतर्गत 1860 आणि पूर्णपणे आयुष विभागातर्फे वित्त पुरस्कृत, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारे पंजीकृत आहे.
- ही संस्था एका सुंदर परिसराच्या मध्यात बांधलेली असून ल्यूटेन झोन मध्ये राजधानीच्या केंद्रस्थानी ६८, अशोक रोड, नवी दिल्ली येथे स्थित आहे.
- योगाची आरोग्य विज्ञानाच्या स्वरुपात जबरदस्त क्षमता आहे (खासकरुन तणावासंबंधी, मनोदैहिक रोगांसाठी). ही क्षमता ध्यानात घेऊन भारतीय औषधे आणि होमिओपॅथी वर संशोधनासाठी भूतपूर्व केन्द्रीय परिषदेने व नंतर खाजगी संस्थेने विश्वयतन योगाश्रमाला लागून 5 पलंग असलेले संशोधन रुग्णालय 1970 साली मंजूर केले होते. योग प्रथांचे महत्व व प्रभावशीलता तसेच निवारक, संवर्धनात्मक आणि उपचारात्मक पैलू साकार झाल्यावर, क्षेत्रात विज्ञानाच्या अध्ययना द्वारे योग केन्द्रीय संशोधन संस्थेची (CRIY) स्थापना १ जानेवारी, 1976 ला झाली आणि योग संशोधन रुग्णालयात काम करणा-या कर्मचा-यांना त्यामध्ये सामील करण्यात आले.
- सामान्य लोकांसाठी फुकट योग-प्रशिक्षण देणे आणि योगाच्या विभिन्न प्रथांवर वैज्ञानिक संशोधन करणे हे CRIY च्या मुख्य कार्यक्रमांमध्ये समाविष्ट होते. 1998 पर्यंत CRIY असे संस्था होते ज्यात योगीक संशोधनावर योजना, संवर्धन आणि समन्वय होत असे. वाढत्या कार्यक्रम आणि गरज लक्षात घेउन उच्च प्रतीच्या गुणवत्ता सेवा प्रदान करण्यासाठी देशभरात योगाचे वाढते महत्व साकार करण्याव्यतिरिक्त, राष्ट्रीय योग संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तिचे नाव मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था ((MDNIY) असे देण्यात आले. ह्या संस्थेत केन्द्रीय संशोधन संस्थेला (CRIY) ला समाविष्ट करण्यात आले.
- अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या: www.yogamdniy.nic.in
आयुष विभागाची प्रकाशने
- 21 रोगांच्या उपचारांवर आधारित योग आणि प्राकृतिक चिकित्सा
- आयुष बाबतच्या कल्पना आणि सत्य
- आयुष मधील गुणवत्ता नियंत्रण
स्त्रोत: आयुष विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार
No comments:
Post a Comment
Thanks you