Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Monday, February 14, 2022

ऑलिम्पिकस्टार अभिनव बिंद्रा Olympic Star 🌟🌟 Abhinav Bindra

 ऑलिम्पिकस्टार अभिनव बिंद्रा Olympic Star 🌟🌟 Abhinav Bindra

लेफ्टनंट कर्नल अभिनव अपजित बिंद्रा: (जन्म: २८ सप्टेंबर, इ.स. १९८२) भारतीय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता, निवृत्त नेमबाज आणि उद्योजक आहे. वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला आणि फक्त २ भारतीयांपैकी एक आहे. २००८ उन्हाळी ऑलिंपिक आणि २००६ ISSF जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या १०-मीटर एअर रायफल स्पर्धेसाठी एकाच वेळी जागतिक आणि ऑलिम्पिक विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय आहे. बिंद्राने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सात पदके आणि आशियाई स्पर्धेत तीन पदकेही जिंकली आहेत.

वैयक्तिक माहिती

पूर्ण नाव:- अभिनवसिंग बिंद्रा

जन्मदिनांक:- २८ सप्टेंबर, १९८२ (वय: ३९)

जन्मस्थान:- देहरादून, उत्तराखंड, भारत

खेळ:- नेमबाजी

खेळांतर्गत प्रकार:- १० मीटर हवाई रायफल

पदक माहिती

भारतभारत या देशासाठी खेळतांंना

ऑलिंपिक खेळ:- सुवर्ण, २००८ बीजिंग, १० मीटर हवाई रायफल

विश्व नेमबाजी अजिंक्यपद:- सुवर्ण, २००६ जाग्रेब, पुरुष १० मीटर हवाई रायफल

कॉमनवेल्थ खेळ- रौप्य, २००२ मॅंचेस्टर, १० मीटर हवाई रायफल (एकेरी)

सुवर्ण, २००२ मॅंचेस्टर,१० मीटर हवाई रायफल (जोड़ी), 

कांस्य, २००६ मेलबर्न, १० मीटर हवाई रायफल (एकेरी), 

सुवर्ण, २००६ मेलबर्न, १० मीटर एअर रायफल (जोड़ी), 

सुवर्ण, २०१० दिल्ली, १० मीटर एअर रायफल जोडी

रौप्य, २०१० दिल्ली, १० मीटर हवाई रायफल एकेरी

अभिनवचे शिक्षण चंदीगड येथे झाले. त्याची नेमबाजी पाहून वडिलांनी त्याला घरातच शूटिंग रेंज बनवून दिली. वयाच्या १६व्या वर्षी, सन १९९८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा तो सहभागी झाला, तेव्हा तो वयाने सर्वात लहान खेळाडू होता. २००१ साली बिंद्राने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके मिळवली.

अभिनव बिंद्राने इ.स. २००८च्या बीजिंग उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये, तसेच झाग्रेब, क्रोएशिया येथे झालेल्या इ.स. २००६च्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मी. हवाई रायफल नेमबाजी सुवर्णपदक जिंकले. पात्रता फेरीत ५९६ गुणांसह तो चौथ्या स्थानावर राहिला होता; अंतिम स्पर्धेत १०४.५ गुण संपादन करून त्याने एकूण ७००.५ गुणांची कमाई केली.

हार्पर स्पोर्टने बिंद्रा यांचे आत्मचरित्र, A Shot at History: My Obsessive Journey to Olympic Gold, प्रकाशित केले. या पुस्तकाचे त्याने ऑक्टोबर 2011 मध्ये क्रीडा लेखक रोहित बृजनाथसोबत सह-लेखन केले होते. केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांच्या हस्ते 27 ऑक्टोबर 2011 रोजी एका कार्यक्रमात त्याचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाला सकारात्मक पुनरावलोकने मिळाली. हर्षवर्धन कपूरला पुस्तकावर आधारित भविष्यातील बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आले.

पुरस्कार

२००० – अर्जुन पुरस्कार.

२००१ – राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कार (भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार).

२००९ – पद्मभूषण.

२०११ - ऑनररी लेफ्टनंट कर्नल भारतीय सेना

लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग हे अभिनवला लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा प्रदान करताना (नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर 2011 रोजी)
(खासाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त पहिला राज्य क्रीडा दिन दिनांक १५ जानेवारी २०२२ पासून प्रत्येक आठवड्याला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंची माहितीची सृंखला शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत आपल्यासाठी सुरू केली आहे. आपणास ही संकल्पना कशी वाटली या बद्दल जरुर प्रतिक्रिया द्यावी.)


1 comment:

Thanks you

Participate in All India Interuniversity SOFTBALL tournament 2024-25

 दिनांक ३० एप्रिल ते ४ मे २०२५ रोजी विश्वकर्मा सिम्हापूरी युनिव्हर्सिटी, नेल्लूर, आंध्रप्रदेश येथे होत असलेल्या अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धे...