Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Friday, February 18, 2022

ऑलिम्पिक स्टार 🌟🌟🌟 पद्मश्री पुरस्कार विजेता विजेंदर सिंग

ऑलिम्पिक स्टार पद्मश्री पुरस्कार विजेता विजेंदर सिंग

विजेंदर सिंह बेनीवाल मुख्यतः विजेंदर सिंह या नावाने ओळखले जातात ते एक प्रसिध्द भारतीय बॉक्सर आहेत. त्यांनी गेल्या २ वर्षापासून व्यावसायिक बॉक्सिंगची सुरूवात केली आहे. आपल्या या करीयर मध्ये त्यांनी ८ सामन्यांपैकी ८ ही सामने जिंकले आहेत. हरियाणा राज्यातील भिवनी जिल्हयातील कलुवास या गावात जन्मलेले.

विजेंदरने गावातच आपले शिक्षण पूर्ण केल्यावर भिवनी येथुन महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले आहे. येथेच बॉक्सिंग क्लब मध्ये त्यांनी जगदीश सिंह यांच्या कडुन प्रशिक्षण घेतले. भारतीय बॉक्सिंग संघात प्रवेशानंतर भारतीय बॉक्सिंग कोच गुरवक्श सिंह संधू यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे.

विजेंदर सिंह यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकले आहेत. २००४ च्या एथेन्स समर ऑलंपिक मध्ये ८ व्या क्रमांकावर राहीले होते, तर २००६ च्या कॉमनवेल्थ मध्ये त्यांनी ब्रॉंझ मेडल जिंकले होते. २००८ च्या बिजींग समर ऑलंपिक मध्ये ब्रॉंझ पदक जिंकले होते. हे कोणत्याही भारतीयासाठी बॉक्सिंग चे पहीले पदक होते, यामुळे त्यांचा भारतात गौरव करण्यात आला.

भारतीय खेळांसाठीचा सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न अवार्ड देवून त्यांना सन्मानीत करण्यात आले. त्यासोबतच त्यांना चौथा नागरी सन्मान पद्मश्री २००९ मध्ये देण्यात आला होता. जागतिक बॉक्सिंग असोसिएशन ने त्यांना आपल्या वार्षिक मिडलवेट कॅटेगरी सूचित २८०० पॉइंट देवून क्रमांक एक वर स्थापीत केले होते. २०१२ च्या ऑलंपिक मध्ये त्यांना निराशा हाती आली.

२९ जुन २०१५ रोजी त्यांनी आपले बॉक्सिंग करीयर सोडुन व्यावसायिक बॉक्सिंग क्षेत्रात पदार्पण केले.

पुर्वीचे व्यक्तिगत जीवन – Early Life

विजेंदर सिंह यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९८५ रोजी हरियाणा राज्यातील भिवणी जिल्हयातील कलुवास या गावी झाला. त्यांचे वडील महिपाल सिंह बेनीवाल हे रोडवे डिपार्टमेंट मध्ये ड्रायव्हर आहेत तर आई एक गुहिणी आहे.

वेलुवास येथुन त्यांची प्राथमिक व माध्यमिक शिक्षा संपन्न झाली आहे. भिवणी येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, मनोज बेनिवाल या थोरल्या भावाकडुन त्यांना बॉक्सिंग ची प्रेरणा मिळाली. मनोजला बॉक्सिंग चे राज्यस्तरीय पदकामुळेच आर्मीत नौकरी मिळाली त्यामुळेच विजेंदर ने बॉक्सिंग मध्येच आपले करियर करायचे ठरविले होते.

भिवनीत बॉक्सिंग क्लब मध्ये बॉक्सिंग चा अभ्यास करतांना जगदीश सिंह यांनी त्यांची प्रतिभा ओळखुन त्यांना प्रोत्साहन दिले व त्यांना कडक शिस्तीचे प्रशिक्षण दिले. २००० मध्ये ते राष्ट्रीय स्तराचे बॉक्सर बनले होते. २००३ मध्ये ऑल इंडिया युथ बॉक्सिंग चॅंपीयन बनले. त्यांचे आक्रमण, प्रतिहल्ले व सुरक्षित रक्षातंत्र यामूळेच त्यांना हरविणे कठीण व्हायचे.

विजेंदर सिंगचे आवडते सिनेकलाकार हॉलीवुड एक्शन हिरो सिल्वस्टर स्ट्रॉलोन व बॉक्सर म्हणुन मुहम्मद अली आणि माईक टायसन कडून त्यांना बरीच प्रेरणा मिळाली आहे.

२०१४ मध्ये आपली जवळची मैत्रीण अर्चना सिंह हिच्याशी विवाह केला. त्यांचा मुलगा अर्बिर सिंह याचा जन्म २०१६ मध्ये झाला.

अमली पदार्थावरून वाद – Controversy

६ मार्च २०१२ मध्ये चंदीगढ जवळील छत्प् रेसीडेन्सी मध्ये पोलीसांच्या धाडीत २६ किलो हेरोईन व इतर अमली द्रव्ये जप्त करण्यात आले त्या ठिकाणी विजेंदर यांची गाडी आढळली त्यानंतर प्रसार माध्यमांनी या प्रकरणात फारच रस घेवून विजेंदर सिंह यांची कोंडी केली.

पंजाब पोलीसांनी विजेंदर सिंग यांना ताब्यात घेतले त्यांच्या रक्ताचे व केसांचे नमूने घेण्यात आले परंतू तपासण्यांमध्ये ते निर्दोष मुक्त झाले, गाडी त्यांच्या जवळच्या रामधारी सिंह यांनी नेली होती जे अमली द्रव्य सेवन करण्याचे आदी होते.

या सर्वांमुळे विजेंदर खचले नाही प्रसार माध्यमांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. विजेंदर यांचे बॉलिवूड मध्ये १३ जून २०१४ रोजी त्यांची फुगली ही फिल्म रिलीज झाली होती. त्यात त्यांनी चांगला अभिनय केला होता. याशिवाय अनेक रियालीटी शो मध्ये पाहुणे म्हणुनही ते जात असतात.

प्रोफेशनल करियर – Career

१०५ स्पोर्ट अॅण्ड इंटरटेनमेंट नुसार त्यांनी फ्रॅंक वारेन क्वीनवेरी प्रमोशन सोबत महत्वाचा करार करून आपले बॉक्सिंगचे प्रोफेशनल करियर सुरू केले. १० ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांनी आपला पहिला प्रोफेशनल सामना खेळला. आजवर त्यांनी ८ सामने खेळुन एकही हार पत्करली नाही. जगातील नामवंत बॉक्सरांना त्यांनी धुळ चारली आहे.

विजेंदर सिंह एक यशस्वी बॉक्सर आहेत ज्यांनी एका साधारण माणसापासुन आज जगात प्रसिध्दी मिळवणाऱ्या सेलीब्रिटीची प्रसिध्दी मिळवली आहे. विजेंदर आपल्या खेळाप्रती पूर्णपणे समर्पक आहेत ते यासाठी ६ ते ८ तास सराव करतात. अनेक युवा त्यांच्या कडून आज प्रेरणा घेत आहेत. विजेंदरमूळे आज हजारो नवयुवक बॉक्सिंग ला आपले करीयर बनवत आहेत. विजेंदर सारख्या दिपकाने आज हजारो दिपक प्रज्वलीत केले आहेत.

तर आज आपण पाहिली विजेंदर सिंह यांच्या जीवनातील काही महत्वाची माहिती, आशा करतो आपल्याला हि माहिती आवडली असेल आवडल्यास या माहितीला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

(खासाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त पहिला राज्य क्रीडा दिन दिनांक १५ जानेवारी २०२२ पासून प्रत्येक आठवड्याला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंची माहितीची सृंखला शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत आपल्यासाठी सुरू केली आहे. आपणास ही संकल्पना कशी वाटली या बद्दल जरुर प्रतिक्रिया द्यावी.)

No comments:

Post a Comment

Thanks you

Participate in All India Interuniversity SOFTBALL tournament 2024-25

 दिनांक ३० एप्रिल ते ४ मे २०२५ रोजी विश्वकर्मा सिम्हापूरी युनिव्हर्सिटी, नेल्लूर, आंध्रप्रदेश येथे होत असलेल्या अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धे...