ऑलिम्पीक स्टार लिअँडर पेस | Olympic Star Leander Paes
(खासाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त पहिला राज्य क्रीडा दिन दिनांक १५ जानेवारी २०२२ पासून प्रत्येक आठवड्याला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंची माहितीची सृंखला शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत आपल्यासाठी सुरू केली आहे. आपणास ही संकल्पना कशी वाटली या बद्दल जरुर प्रतिक्रिया द्यावी.)
लिएंडर पेस हा भारतीय टेनिस खेळाडू आहे. १९९६ मध्ये अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरी कांस्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय होता. त्याने ८ दुहेरी आणि १० मिश्र दुहेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत.
सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिसपटू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत.
वैयक्तिक माहिती
नाव- लिएंडर एड्रियन पेस
खेळ- लॉन टेनिस
जन्मतारीख- १७ जून १९७३ (वय ४८)
जन्म ठिकाण- कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
निवासस्थान- मुंबई, महाराष्ट्र, भारत
उंची- 5 फूट 10 इंच
वडील- वेस पेस
आई- जेनिफर पेस
बक्षीस रक्कम- $८,५८७,५८६ (अंदाजे)
ग्रँड स्लॅम जेतेपदे- ८ दुहेरी आणि १० मिश्र दुहेरी
पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (१९९६-९७)
अर्जुन पुरस्कार (१९९०)
पद्मश्री पुरस्कार (२००१)
सुरुवातीचे जीवन
लिएंडर पेस एका क्रीडा कुटुंबातील आहे त्याचे वडील १९७२ म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय फील्ड हॉकी संघात मिडफिल्डर होते तर त्याची आई बास्केटबॉल खेळाडू होती जी १९८० आशियाई बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बास्केटबॉल संघाची कर्णधार होती.
लिएंडरने कलकत्ता विद्यापीठाच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. यापूर्वी त्यांनी ला मार्टिनियर कलकत्ता, मद्रास ख्रिश्चन कॉलेज उच्च माध्यमिक विद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे.
पेस २००५ मध्ये रिया पिल्लईसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होता. त्यांना एक मुलगी आयना होती. कौटुंबिक समस्यांमुळे २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
कारकीर्द
लिएंडर पेसने वयाच्या ५ व्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली आणि १९८५ मध्ये मद्रास (आताचे चेन्नई) येथील टेनिस अकादमीमध्ये प्रवेश केला. त्याने १९९० मध्ये विम्बल्डन ज्युनियर विजेतेपद जिंकले आणि जगातील प्रथम क्रमांकाचा ज्युनियर खेळाडू बनला.
पुढे १९९० मध्ये भारतीय डेव्हिस कप संघात सामील झाला आणि १९९१ मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये मैदानात उतरला.
त्याने १९९६ मध्ये अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष एकेरी टेनिस कांस्यपदक जिंकले. त्याचा दुहेरी भागीदार महेश भूपती १९९४ मध्ये त्याच्या सोबत खेळांला सुरू झाला.
ग्रँड स्लॅम स्पर्धां
ग्रँड स्लॅम मिश्र दुहेरीचे निकाल
ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद २००३, २०१०, २०१५ मध्ये जिंकले
फ्रेंच ओपनचे जेतेपद २०१६ मध्ये जिंकले
१९९९, २००३, २०१०, २०१५ मध्ये विम्बल्डन ओपनचे विजेतेपद जिंकले
२००८, २०१५ मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद जिंकले
लिएंडर पेसचे ग्रँडस्लॅम दुहेरीचे विजेतेपद
ऑस्ट्रेलियन ओपन २०१२ मध्ये जिंकली
फ्रेंच ओपन १९९९, २००१, २००९ मध्ये जिंकले
१९९९ मध्ये विम्बल्डन जिंकले
यूएस ओपन २००६, २००९, २०१३ मध्ये जिंकले
महत्वाचे
महेश भूपतीसह पेसच्या नावावर डेव्हिस कपच्या इतिहासात सलग २४ विजयांचा विक्रम आहे.
महेश भूपती आणि लिएंडर पेस या जोडीला “इंडियन एक्सप्रेस” असे टोपणनाव देण्यात आले.
पेस हा दुहेरीचा अप्रतिम टेनिसपटू आहे. त्याने ग्रँड स्लॅम, ऑलिम्पिक, वर्ल्ड टूर फायनल्स, वर्ल्ड टूर मास्टर्स, एटीपी चॅलेंजर्स, वर्ल्ड टूर सिरीज आणि डेव्हिस कप टाय यासारख्या अनेक प्रतिष्ठित स्पर्धा जिंकल्या आहेत.
लिएंडर पेसने डेव्हिस कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे आणि ४३ विजयांसह सर्वाधिक डेव्हिस कप दुहेरी जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
Good 👍
ReplyDelete👍
ReplyDelete